श्रीदेवीला पत्नी मानणाऱ्या 'या' व्यक्तीने केलं मुंडन

अभिनेत्री श्रीदेवीच्या अकस्मात मृत्यूमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 5, 2018, 11:08 AM IST
श्रीदेवीला पत्नी मानणाऱ्या 'या' व्यक्तीने केलं मुंडन  title=

श्योपुर : अभिनेत्री श्रीदेवीच्या अकस्मात मृत्यूमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. 

अशाच एका मध्य प्रदेशच्या श्योपुरमध्ये राहणाऱ्या ओमप्रकाश मेहराला या घटनेचा सर्वाधिक धक्का बसला आहे. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की, श्रीदेवी बोनी कपूर यांची पत्नी आहे. असं असलं तरीही श्रीदेवीला ओमप्रकाश मेहरा यांनी आपली पत्नी मानलं होतं. 

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर ओमप्रकाश मेहरा यांना खूप मोठा धक्का बसला. रविवारी श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळताच पाया खालची जमीनच गेली. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर ओमप्रकाश यांनी ददुनी ग्रामच्या शाळेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता. एवढचं नव्हे तर त्यांनी स्वतःच मुंडन करून श्रीदेवीच्या फोटोवर अनेक फुलं अर्पण केलं. 

वोटर लिस्टमध्ये देखील पत्नीच्या जागी श्रीदेवीचं नाव 

2002 मध्ये ओमप्रकाश मेहराने वोटर लिस्टने आपल्या पत्नीच्या ठिकाणी श्रीदेवीचं नाव दाखल केलं आहे. याचप्रमाणे 3 हजारहून अधिक पत्र श्रीदेवी यांना पाठवले आहेत. मात्र ते देखील श्रीदेवीला कधीच भेटले नाहीत. ओम प्रकाश शाळेत शिकत होते तेव्हा त्यांनी श्रीदेवीचा पहिला सिनेमा पाहिला होता. तेव्हापासून ते श्रीदेवीचे चाहते होते.