दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगचा वाढदिवस परदेशात अशाप्रकारे केला सेलिब्रेट

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला.

Updated: Jul 12, 2022, 02:00 PM IST
दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगचा वाढदिवस परदेशात अशाप्रकारे केला सेलिब्रेट title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. त्याने पत्नी दीपिका पदुकोणसोबत आपला खास दिवस साजरा केला.  हे कपल रणवीर सिंगच्या वाढदिवसासाठी यूएसमध्ये होतं. आता या दोघांनी त्यांच्या खास दिवसाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या संबंधित इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या सुंदर प्रवासाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. रणवीरची पोस्ट जंगलाच्या अनुभवाबद्दल होती. तर दीपिकाने तिच्या बाइकिंग प्रवासातील फोटो आणि समुद्रकिनार्यावरचे फोटो शेअर केले आहेत. रणवीरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत रणवीरने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,  'लव्ह टू लव्ह यू #baby #birthday #photodump.' दीपिकाने तिच्या व्हेकेशनची एक झलक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आपलं जीवन नवीन अनुभव आणि साहसांनी भरलेलं असू दे'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सोमवारी सकाळीच अमेरिकेहून मुंबईला परतले. हे कपल एका आठवड्याच्या सुट्टीवर गेलं होतं जिथे त्यांनी त्यांच्या व्यस्त शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढून एकत्र चांगला वेळ घालवला. त्याचबरोबर या दोघांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटात जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे रोहित शेट्टीचा 'सर्कस'ही आहे.