शाहिद कपूरच्या भावाचा हार्टब्रेक करुन आता अनन्या पांडे 'या' अभिनेत्याच्या प्रेमात! चर्चांनी धरला जोर

अनन्या पांडे तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. 

Updated: Jul 12, 2022, 01:20 PM IST
शाहिद कपूरच्या भावाचा हार्टब्रेक करुन आता अनन्या पांडे 'या' अभिनेत्याच्या प्रेमात! चर्चांनी धरला जोर title=

मुंबई : अनन्या पांडे तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. तिचं नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याशी नेहमी जोडलं जातं. याआधी अनन्या पांडेला शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरसोबत अनेकदा स्पॉट केलं गेलं होतं. दोघंही अनेकदा एकत्र सुट्टीवर जाताना दिसले होते.

इतकंच नाही तर अनन्याने इशानच्या कुटुंबियांना भेटायलाही सुरुवात केली. शाहिदच्या बर्थडे पार्टीतही अनन्याने त्याच्यासोबत अनेक पोज दिल्या. पण काही काळापूर्वी त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी समोर आली आणि आता अनन्याने आणखी एका अभिनेत्याला तिचं हृदय दिल्याचं वृत्त आहे.

अनन्या-आदित्यच्या अफेअरच्या बातम्या
ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सध्या बॉलिवूडचा हँडसम हंक आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. हे दोघं कधीच एकत्र दिसले नसले तरी त्यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडिया जगतात खूप चर्चेत आहेत. अनन्या आणि आदित्य कधीच चित्रपटात एकत्र दिसले नव्हते पण ते म्हणतात की जिथे आग असते तिथून धूर हा निघतोच.  आदित्य आणि अनन्यासोबतही असंच काहिसं घडलं आहे.  

आदित्य 13 वर्षांनी मोठा आहे
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आदित्य रॉय कपूर  अभिनेत्री अनन्या पांडेपेक्षा एक-दोन वर्षांनी नाही तर 13 वर्षांनी मोठा आहे. आदित्य 36 वर्षांचा आहे, तर अनन्या फक्त 23 वर्षांची आहे. आदित्य रॉय कपूरचं नाव श्रद्धा कपूरसोबतही जोडलं गेलं होतं.

'आशिकी 2'च्या शूटिंगदरम्यान त्यांच्या रिलेशनशिपची बातमी समोर आली होती. यानंतर आदित्य आणि श्रद्धाने 'ओके जानू' नावाचा चित्रपटही केला, पण हा चित्रपट पडद्यावर फारसा चालला  नाही. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांचं नातंही तुटलं. इतक्या वर्षांनंतर आता आदित्यचं नाव पुन्हा एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं आहे आणि ते नाव म्हणजे अनन्या पांडे.

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लाइगर' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गये हम कहाँ' या चित्रपटातही दिसणार आहे. ज्यासाठी अनन्या पांडे सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर आदित्य रॉय कपूरच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच मृणाल ठाकूरसोबत 'गुमराह' चित्रपटात दिसणार आहे.