'ब्रह्मास्त्र' सिनेमा बनायला इतका वेळ का लागला? या प्रश्नावर रणबीर कपूरचं मोठं वक्तव्य

या वर्षी रणबीर कपूरचे दोन बॅक टू बॅक सिनेमे रिलीज होणार आहेत

Updated: Jul 11, 2022, 08:29 PM IST
'ब्रह्मास्त्र' सिनेमा बनायला इतका वेळ का लागला? या प्रश्नावर रणबीर कपूरचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : या वर्षी रणबीर कपूरचे दोन बॅक टू बॅक सिनेमे रिलीज होणार आहेत. या महिन्यात 22 जुलैला रणबीरचा 'शमशेरा' चित्रपट रिलीज होत आहे. ज्यासाठी रणबीर प्रमोशनसाठी खूप मेहनत घेत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जाऊन तो आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत असतो. आता नुकतंच रणबीरने त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाविषयीही सांगितलं आणि चित्रपट पूर्ण होण्यास ५ वर्षे का लागली हे देखील सांगितलं.

खरंतर, एका मुलाखतीदरम्यान जेव्हा रणबीर कपूरला ब्रह्मास्त्रला उशीर होण्या मागचं कारण  विचारलं असता? यावर रणबीर कपूर म्हणाला, 'खरं सांगायचं तर ब्रह्मास्त्रला झालेला विलंब इतर कोणत्याही कारणामुळे नसून चित्रपटाच्या कथेमुळे झाला आहे. आमचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट वेगळ्या पार्श्वभूमीवर बनत आहे आणि त्यासाठी वेळ लागणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो 100, 200 किंवा 40 दिवसात बनवणं, त्याचा परिणाम कसा होईल, पण ब्रह्मास्त्राच्या विलंबावर मी म्हणेन की यात कोरोनाचीही महत्त्वाची भूमिका आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर ब्रह्मास्त्रची कथा शिवा  नावाच्या व्यक्तीभोवती फिरत असल्याचं दिसतं, ज्याच्याकडे अलौकिक शक्ती आहे. ज्याबद्दल त्याला स्वतःला माहिती नसते.

शिव आणि ईशाच्या प्रेमकथेच्या दरम्यान, त्याला त्याच्या शक्तींबद्दल माहिती मिळते, जी ब्रह्मास्त्र वाचवू शकते. अमिताभ बच्चन आणि नागार्जुन या विश्वाचं रक्षण करताना दिसले, तर मौनी रॉय नकारात्मक भूमिकेत दिसली. ब्रह्मास्त्र पार्ट १ 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.