पेंटिंग खरेदी करण्यासाठी कार्तिक आर्यन निघाला थेट सायकलवरून; पोस्ट शेअर करत म्हणाला...

बॉलिवूड इंडस्ट्रीतील गोंडस अभिनेता कार्तिक आर्यन आजकाल लाखो हृदयांवर राज्य करतो. 

Updated: Jul 9, 2022, 08:13 PM IST
पेंटिंग खरेदी करण्यासाठी कार्तिक आर्यन निघाला थेट सायकलवरून; पोस्ट शेअर करत म्हणाला... title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील गोंडस अभिनेता कार्तिक आर्यन आजकाल लाखो हृदयांवर राज्य करतो. अभिनेत्याचा चित्रपट 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ज्यानंतर कार्तिक आणि चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि निर्माते खूप आनंदी आहेत. हा आनंद साजरा करण्यासाठी कार्तिक सध्या युरोपला गेला आहे. तिथून तो त्याचे प्रत्येक अपडेट फॅन्ससोबत शेअर करत आहे.

अलीकडे, अभिनेत्याने त्याच्या इन्स्टा हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कार्तिक सायकल चालवताना दिसत आहे. या फोटोमध्ये कार्तिक अनेक बॅग आणि पेंटिंगसह सायकलवर दिसत आहे. फोटोसोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एक पेंटिंग विकत घेतली, जी म्हणते की कला मोफत आहे'.

कार्तिकचा हा क्लिक चाहत्यांना खूप आवडला आहे चाहते या फोटोवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. कोणी त्याच्या स्मितहास्याचे कौतुक करत आहेत.तर कोणी त्याला क्यूट म्हणत आहेत, तर कोणी 'तुझं स्मित बरंच काही सांगून जातं' असं म्हणत आहेत.

इतकंच नाही तर कार्तिक जेव्हापासून युरोपला गेला आहे. तेव्हापासून तो दररोज व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. ज्यामध्ये तो त्याच्या युरोप व्हेकेशनचा आनंद लुटताना दिसत आहे. याशिवाय कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एका रोलिंग कॉन्सर्टमध्ये सहभागी होतानाचे व्हिडिओही शेअर केले आहेत. ज्यामध्ये कार्तिक मित्रांसोबत खूप एन्जॉय करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रोहित धवन दिग्दर्शित 'शहजादा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन दिसणार आहे.