लग्नानंतर 'या' अभिनेत्रीला करावं लागलं रुग्णालयात दाखल

असं काय झालं 'या' अभिनेत्रीसोबत की तिला लग्नानंतर रुग्णालयात दाखल व्हावं लागलं 

Updated: Jul 9, 2022, 07:47 PM IST
लग्नानंतर 'या' अभिनेत्रीला करावं लागलं रुग्णालयात दाखल title=

मुंबई : बॉलिवूडप्रमाणेच आता टीव्ही मालिकांमध्येही लग्नाचा धडाका सुरु आहे. अनेक अभिनेता - अभिनेत्री लग्नाच्या पवित्र बंधनात अडकत चालले आहेत. नुकतचं एका अभिनेत्रीचे लग्न पार पडलं होत. या लग्नाच्या काही दिवसानंतर तिला रुग्णालयात दाखल कराव लागलं होत. या घटने संदर्भात तिने एका मुलाखतीत माहिती दिली आहे.  

अभिनेत्री सृष्टी माहेश्वरी ही 'पांड्या स्टोर' या मालिकेत अनिताच्या भूमिकेत दिसली होती. या अभिनेत्रीचे 19 जून रोजी लग्न झाले होते. या लग्नानंतर काही दिवसांनी तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. सृष्टीची अचानक तब्येत इतकी बिघडली की तिला घाईघाईत रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 

सृष्टी माहेश्वरी हीने इंडिया फोरमशी बोलताना सांगितले की, 'गेल्या काही दिवसांपासून मला बरे वाटत नव्हते आणि पोटात दुखू लागल्यावर मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले. मला अन्नातून विषबाधा झाली होती. त्यावेळी खूप वेदना होत होत्या, हलताही येत नव्हते. सृष्टीने पुढे सांगते की, 'सध्या डॉक्टरांनी काळजी घेण्यास सांगितले आहे. लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. 

पती करणबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली की तो खूप सपोर्टिव्ह आहे. या कठीण प्रसंगात तो सदैव माझ्यासोबत होता. त्याने माझी खूप चांगली काळजी घेतली. 

'या' दिवशी झाले लग्न 
सृष्टी माहेश्वरीचा नवरा करण बेंगळुरूस्थित टेक इंजिनिअर आहे. गेल्या महिन्यात 19 जून रोजी सृष्टी आणि करणचे लग्न झाले होते. सृष्टीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये मेहंदी आणि हळदीपासून लग्नापर्यंतचे सर्व फोटो समाविष्ट आहेत. या लग्नात दोन्ही कुटुंबातील काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच सहभागी झाली होती.