नवी दिल्ली : सिनेमाप्रेमी आपला आवडता सिनेमा पाहण्यासाठी पैसे खर्च करुन तिकीट खरेदी करतात आणि सिनेमागृहात सिनेमा पाहतात. अशाच प्रकारे अॅक्शन सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्यांना एका विचित्र प्रकाराचा सामना करावा लागला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
तुम्ही अॅक्शन सिनेमा पाहण्यासाठी तिकीट खरेदी केलं आणि सिनेमागृहात बसताच रोमँटिक सिनेमा सुरु झाला तर? त्यावेळी तुमची रिअॅक्शन कशी असेल?.
असं झाल्यास कदाचित तुम्हाला राग येईल किंवा तुम्ही तो सिनेमा पाहण्यास सुरुवात कराल. सिनेमागृहात अॅक्शन सिनेमा ऐवजी रोमँटिक सिनेमा सुरु झाल्याच्या घटनेवर सोशल मीडियात युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
झालं असं की, प्रेक्षकांनी हॉलिवूड सिनेमा 'ब्लॅक पँथर' पाहण्यासाठी तिकीट खरेदी केलं. मात्र, सिनेमागृहात बसल्यानंतर त्यांच्यासमोर '५० शेड्स फ्रीड' हा सिनेमा सुरु झाला. यानंतर सिनेमागृहात एकच गोंधळ उडाला.
I never laughed so hard. I’m happy i came to the black theatre pic.twitter.com/pxdTFK4Qt3
— The Chef (Steve) (@ChefWaites) February 16, 2018
Grey, black... it's an easy mistake
— Jason Ryder (@JJSynn) February 16, 2018
Hands. Would. Have. Been. Thrown. At. Staff. pic.twitter.com/uGyywfZyrY
— The Superman of Earth-216 (@KryptonianBlerd) February 16, 2018
I would’ve riot if this happened to me pic.twitter.com/ns3TQGKC1K
— Edgar Ortega (@EdgarOrtega875) February 16, 2018
They thought that movie was called "50 Shades Blacker"....https://t.co/5mKVQoK25t
— DQ (@DQ_Doo1) February 16, 2018
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील अटलांटा येथील रिगल्स अटलांटिक स्टेशन सिनेमागृहात हा प्रकार घडला आहे.
हॉलिवूड सुपरहिरो सिनेमा 'ब्लॅक पँथर' ला जगभरात प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतामध्येही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'ब्लॅक पँथर' हा सिनेमा बॉलिवूड सिनेमांवर भारी पडत असल्याचं दिसत आहे.