हजारो चाहत्यांसमोर ‘अय्यारी’ची ही अभिनेत्री उप्स मुव्हमेंटला पडली बळी

अनेकदा अभिनेत्रींना भर कार्यक्रमात उप्स मुव्हमेंटला सामोरं जावं लागतं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 18, 2018, 03:28 PM IST
हजारो चाहत्यांसमोर ‘अय्यारी’ची ही अभिनेत्री उप्स मुव्हमेंटला पडली बळी title=

मुंबई : अनेकदा अभिनेत्रींना भर कार्यक्रमात उप्स मुव्हमेंटला सामोरं जावं लागतं. 

असाच एक प्रकार अय्यारी सिनेमातील अभिनेत्री रकुल प्रीतसोबत झाली आहे. अय्यारी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत दिल्लीतील एका कॉलेजमध्ये गेले होते. यावेळी रकुलला एका लाजीरवाण्या क्षणाला सामोरे जावे लागले. 

नेमकं काय झालं?

 याठिकाणी त्यांनी हजारो विद्यार्थ्यांसमोर ‘ले डूबा’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला. मात्र याचदरम्यान असे काही घडले ज्यामुळे रकुल प्रीतला वार्डरोब मालफंक्शनला बळी पडावे लागले. सध्या रकुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

त्याचे झाले असे की, सिद्धार्थ आणि रकुल दिल्लीतील एसआरसीसी कॉलेजमध्ये ‘अय्यारी’च्या प्रमोशनसाठी गेले होते. याठिकाणी या दोघांनीही हजारो विद्यार्थ्यांसमोर परफॉर्मन्स केला. मात्र परफॉर्मन्स दरम्यान सिद्धार्थने रकुलला उचलल्यामुळे तिचा ड्रेस काहीसा वरच्या बाजूने गेला. अगोदरच शॉर्ट ड्रेसमध्ये असलेल्या रकुलला जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तिने लगेचच सिद्धार्थला खाली उतरविण्यास सांगितले. तसेच ड्रेस सावरत पुन्हा विद्यार्थ्यांसमोर परफॉर्मन्स केला. मात्र यादरम्यान अनेकांनी रकुल आणि सिद्धार्थमधील हा सीन मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला. 

या प्रकारामुळे रकुल सुरूवातीला शरमेने मान खाली घातली पण पुन्हा तिने विद्यार्थ्यांसमोर, प्रेक्षकांसमोर प्रमोशन अॅक्टिव्हिटी केल्या.