परिणीती चोप्राला साऊथ सिनेमात कारायचं आहे काम म्हणाली...

 अभिनेत्रीने साऊथ सिनेमाबाबत एक ईच्छा व्यक्त केली आहे.

Updated: Dec 11, 2022, 12:03 AM IST
परिणीती चोप्राला साऊथ सिनेमात कारायचं आहे काम म्हणाली... title=

मुंबई : बॉलीवूडच्या सर्वात पॉवरफुल अभिनेत्रीबद्दल आपण जेव्हा-जेव्हा बोलतो तेव्हा त्यात परिणीती चोप्राचं नाव नक्कीच समोर येतं. परिणीती चोप्रा तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. 'हसी तो फसी', 'इश्कजादे' आणि 'गोलमाल रिटर्न्स' या चित्रपटांमध्ये परिणीतीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाचे उदाहरण ठेवलं आहे. पण अभिनेत्रीने साऊथ सिनेमाबाबत एक ईच्छा व्यक्त केली आहे. जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. 
 
मी साऊथ सिनेमात काम करण्यासाठी मरत आहे, परिणीती चोप्रा
परिणीती चोप्राने एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की,  "मी दक्षिणेतील चित्रपट करण्यासाठी किती मरत आहे याची कोणीही कल्पना करू शकत नाही. मी बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या भाषेत काम करण्यासाठी चांगल्या चित्रपटाच्या शोधात आहे.

मग तो सिनेमा तमिळ, तेलुगु, मल्याळम किंवा कन्नड असो, मला फक्त चित्रपटाचं भाग व्हायचं आहे. मला फक्त एक चांगला चित्रपट, चांगली स्क्रिप्ट आणि चांगला दिग्दर्शक हवा आहे कारण मला वाटतं की ते उत्तम चित्रपट बनवतात. त्यामुळे मला आयुष्यात एकदा तरी साऊथ सिनेमात काम करायची ईच्छा आहे. जर कोणी महान दिग्दर्शक मला ओळखत असेल तर कृपया माझा विचार करा."

यादरम्यान परिणीती 'हाइट' या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली की, ''लॉकडाऊन दरम्यान मी लंडनमध्ये होती, जेव्हा मला दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितलं, पण मला वाटलं की, कदाचित तो मला असिस्टंट बनवण्यासाठी सगळे सांगत आहेत. नंतर सूरजने सांगितलं की, तिला उंचीचा मार्गावर पोहचवण्यासाठी हिरोईन बनवायचं आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही दिसले होते.

 या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत दिसणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा म्हणाली की, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नसती तर मेगास्टारसोबत काम करणे हा तिचा प्रवास अपूर्ण राहीला असता. परिणिती म्हणते, अमिताभ बच्चन सोबत काम करायची संधी मिळाली नसती तर माझा सिनेमातील प्रवास अपूर्णच राहिला असता. त्यामुळेच ती त्या चित्रपटाचे आभार देखील मानते कारण त्यांच्याशिवाय हा प्रवास कठीण होता''.