VIDEO:'खूबसूरत नारी, ब्यूटीफुल साडी' नव्या नवरीच्या रूपात परिणीती चोप्राचा रॅम्पवॉक

Parineeti Chopra Ramp Walk: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा हिची. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच तिनं रॅम्पवॉक दिला आहे. तोही अगदी लग्न झाल्यानंतर नववधू कशी दिसते तसाच! 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 14, 2023, 06:56 PM IST
VIDEO:'खूबसूरत नारी, ब्यूटीफुल साडी' नव्या नवरीच्या रूपात परिणीती चोप्राचा रॅम्पवॉक title=
parineeti chopra ramp walk after marriage wears manglasutra and sindur video viral

Parineeti Chopra Ramp Walk: यावर्षी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अगदी थाटात पार पडले. त्यापुढे यावर्षीच्या मे महिन्यात त्यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्याच्या आधी ते एकमेकांना डेट करत होते परंतु त्यांनी आपल्या या नात्याविषयी खुलासा केला नव्हता. जेव्हा ते दोघं मार्चमध्ये एकमेकांसोबत स्पॉट होऊ लागले होते. त्यावेळी त्या दोघांच्याही नात्यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगलेली होती. उदयपूर येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगली. लग्नानंतरही दोघंही जणं आपल्या परिवारासोबत, मित्रमंडळींसोबत फिरताना दिसले. आता परिणीती चोप्रा हिनं देशात सर्वात लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या 'लॅक्मे फॅशन वीक'मधून रॅम्प वॉक केला आहे आणि यावेळी तिनं हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर अशा संपुर्णपणे सौभाग्याचं लेणं घालून रॅम्पवॉक केला. 

सध्या तिच्या या रॅम्पवॉकचा व्हिडीओ सर्वत्र चांगला व्हायरल झाला आहे. यात तिनं सुंदर अशी शिमर आणि ग्लिटरची पांढरी-सिल्वर साडी नेसली आहे. तिचा हा साज शृंगार पाहून उपस्थित चाहते घायाळ झाले आहेत. त्यातून या फॅशन वीकमध्ये नामवंत फॅशन डिझायनर आपली कलाकृती पेश करतात. त्यात अनेक ग्लॅमरस आणि हटके स्टाईलचे मॉडर्न आणि पारंपरिक कपडे पाहायला मिळतात. परिणीतीचा लग्नानंतरचा हा पहिला रॅम्पवॉक आहे. त्यातून मध्यंतरी ती अशा सोहळ्यांपासूनही दूर होती. अनेकदा अभिनेत्रींनी गरोदर असतानाही रॅम्पवॉक केला आहे. तर आपल्या हातात तान्हं बाळं घेऊनही रॅम्पवॉक केला आहे. यात करिना कपूर, नेहा धुपिया आणि सुपरमॉडेल पद्मलक्ष्मी यांचा समावेश आहे. 

हेही वाचा : सनी देओल मुलांसोबत दारू पितो? अभिनेत्यानं प्रामाणिकपणे सांगितलं खरं काय ते...

सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे ती म्हणजे या व्हिडीओची. या रॅम्पवॉकच्या वेळी परिणीती चोप्रा फार खुशीतही दिसत होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी तिनं फॅशन डिझायनर्ससोबत डान्सही केला. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहे. यावेळी तिच्या या लुकचं अनेकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. यावेळी तिच्या रॅम्पवॉकला पाहून अनेक तरूणींनाही उत्साह आला आहे. यावेळी राघव चड्ढा असता तर तोही हेच म्हणाला असता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिल्लीमध्ये सध्या हे फॅशन वीक सुरू आहे. अनेकदा हा फॅशन वीक मुंबईत व्हायचा परंतु आता तो दिल्लीत रंगताना दिसतो आहे.