आता गप्प का? परेश रावल यांचा पाकिस्तानी अभिनेत्याला टोला

एअर स्ट्राईकनंतर परेश रावल यांनी अली जफरच्या ट्विटला रिट्विट करत 'आता नि:शब्द' अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

Updated: Feb 28, 2019, 01:04 PM IST
आता गप्प का? परेश रावल यांचा पाकिस्तानी अभिनेत्याला टोला title=

मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते परेश रावल सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. मंगळवारी भारतीय वायूसेनेद्वारा बालाकोटच्या दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर परेश रावल यांनी पाकिस्तानी अभिनेता अली जफरवर टीका केली आहे. अली जफरने जम्मू-काश्मीरमदील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाषण केले होते. त्याच भाषणाचे अली जफरने कौतुक करत कौतुकास्पद ट्विट केलं होतं.

पुलवामा हल्ल्यांच्या १२ दिवसांनंतरच भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. भारताच्या वायूदलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. या एअर स्ट्राईकनंतर परेश रावल यांनी अली जफरच्या ट्विटला रिट्विट करत 'आता नि:शब्द' अशा आशयाचं ट्विट केलं आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आता गप्प का? असा टोला परेश रावल यांनी अली जफरला लगावला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने पुलवामामध्ये सीआरसीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या १२ दिवसांनतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत २६ फेब्रुवारी रोजी मिराज २००० विमानांद्वारा एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यानंतर परेश रावल यांनी ही खऱ्या अर्थाने सुंदर सकाळ असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जवानांचे आभार मानले आहेत. 

 

संपूर्ण बॉलिवूडमधूनही भारतीय वायूसेनेने केलेल्या कारवाईचे स्वागत करत जवानांचं कौतुक केलं आहे.