...तर पंकज त्रिपाठीने 'मिर्झापूर २'मध्ये साकारली असती 'ही' भूमिका

'मिर्झापूर २' या सीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.  

Updated: Oct 27, 2020, 11:25 AM IST
...तर पंकज त्रिपाठीने 'मिर्झापूर २'मध्ये साकारली असती 'ही' भूमिका title=

मुंबई : आताच्या काळात पाहायला गेल तर सर्वत्र फक्त वेब सीरिजची होणारी चर्चा कानावर येते. सध्या 'मिर्झापूर २' या सीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. तर सीरिज मधील 'कालीन भैय्या' ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ही भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठीने उत्तम रित्या साकारली आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान पंकजने सीरिजमधील अशा भूमिकेबद्दल मत मांडलं जी भूमिका त्याला करण्याची इच्छा होती. कालीन भैय्या ऐवजी पर्याय म्हणून दुसरी कोणती भूमीका साकारली असती? हा प्रश्न पंकजला विचारण्यात आला. 

यावर पंकजचं उत्तर होतं अभिनेत्री रसिका दुगलने साकारलेली 'बीना त्रिपाठी'ची भूमिका. 'बीना त्रिपाठी' च्या व्यक्तिरेखेबद्दल मत मांडताना पंकज म्हणाला, 'मला बीना त्रिपाठीची व्यक्तिरेखा खूप रंजक वाटते. जर माझ्याकडे कालीन भैय्या व्यतिरिक्त एखादी व्यक्तिरेखा निवडण्याचा पर्याय असता तर मी निश्चितपणे बीना त्रिपाठीची भूमिका साकारली असती.' 

यामगचं कारण देखील त्याने पटवून दिलं. 'बीना त्रिपाठी'च्या भूमिकेमध्ये एक रहस्य आहे आणि रसिका दुगलसारख्या विलक्षण अभिनेत्रीने ही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे रेखाटली असल्याचं सांगत त्याने रसिकाचे कौतुक केले. 

सांगायचं झालं तर  'मिर्झापूर २' ही सीरिज सध्या चांगलीचं चर्चेत आहे. पंकज त्रिपाठीसोबतच या सीरिजमध्ये अली फजल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौड, अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा, मनु ऋषी चड्ढा आणि राजेश तैलंग यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.