ना बॉलिवूड थांबवू शकलं ना साऊथ; 10 दिवसात शर्वरी वाघच्या 'मुंज्या'नं Box Office वर केली कमाल

Munjya Box office collection Day 10 : शर्वरी वाघच्या 'मुंज्या' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई...  

दिक्षा पाटील | Updated: Jun 17, 2024, 11:33 AM IST
ना बॉलिवूड थांबवू शकलं ना साऊथ; 10 दिवसात शर्वरी वाघच्या 'मुंज्या'नं Box Office वर केली कमाल  title=
(Photo Credit : Social Media)

Munjya Box office collection Day 10 : चित्रपट क्षेत्राविषयी बोलायचे झाले तर त्यात स्थिरता नाही. काही चित्रपट ही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतात आणि बक्कळ कमाई करतात तर काही चित्रपट हे काही कमाई करत नाहीत. तर काही चित्रपट असे असतात ज्यांचं बजेट हे खूप जास्त असतं आणि भरपूर प्रमोशन केलं तरी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकत नाहीत. तर दुसरीकडे काही चित्रपट असतात ज्यांचं बजेट फार कमी असतं आणि ते बक्कळ कमाई करतात. त्यापैकीच एक म्हणजे मुंजा. 

या चित्रपटानं पहिल्या वीकेंड प्रमाणे दुसऱ्या वीकेंडला चांगलं कलेक्शन केलं आहे आणि त्यातून हे स्पष्ट झालं की कमी बजेट असलेले चित्रपट देखील चांगली कमाई करु शकतात. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचीं कमाई केली. त्यानंतर शुक्रवारी या चित्रपटानं  3.5 कोटींची कमाई केली. शनिवारी या चित्रपटानं 6.5 कोटींची कमाई केली. विकेंडला या चित्रपटानं तर इतक्या दिवसात केली नाही तितकी कमाई केली आहे. या चित्रपटानं रविवारी 8.50 कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाचा इतक्या दिवसात रविवारी सगळ्यात जास्त कलेक्शन केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चित्रपटासाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटानं प्रदर्शनाच्या 10 दिवसात 50 कोटींची कमाई केली. याचा अर्थ हा चित्रपट रोज 5 कोटींचं कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला आहे. ही त्यांच्यात मोठी गोष्ट आहे. इतकंच नाही तर अजय देवगण, राजकुमार राव, अक्षय कुमार आणि जान्हवी कपूरचा चित्रपट देखील इतकी चांगली कमाई करु शकला नाही. मुंज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरंतर या चित्रपटाला वर्ड ऑफ माउथ म्हणजेच लोकं एकमेकांना सजेस्ट करताना दिसतात. तर चित्रपट या आठवड्यात चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. जवळपास 20-30 कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात सगळे पैसे परत मिळाले.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाची लग्न पत्रिका पाहता डेझी शाह म्हणाली, 'शत्रुघ्न जी योग्य होते, आजकालची मुलं...'

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर यात अभिनेता अभय वर्मा आणि अभिनेत्री शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. अभय कशा प्रकारे शर्वरीला मुंज्यापासून वाचवतो ते या चित्रपटाला पाहायला मिळत आहे.