OTT Highest Paid Actors ; ओटीटी विश्वातील अभिनेत्यांची कमाई माहितीय का ? हा अभिनेता घेतो सर्वांधिक मानधन

OTT हा गेल्या काही वर्षापासून मनोरंजनाचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म बनताना दिसत आहे.

Updated: May 26, 2022, 09:20 PM IST
 OTT Highest Paid Actors ; ओटीटी विश्वातील अभिनेत्यांची कमाई माहितीय का ? हा अभिनेता घेतो सर्वांधिक मानधन title=

मुंबई : OTT हा गेल्या काही वर्षापासून मनोरंजनाचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म बनताना दिसत आहे. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा प्रेक्षक आता OTT चित्रपट पाहणे पसंत करतात. त्यामुळे आता OTT चा प्रेक्षकवर्ग वाढत चाललाय. दरम्यान तुम्हाला माहितीय का OTT वर सर्वांधिक मानधन घेणार अभिनेता कोण आहेत तो? नाही ना, चला तर जाणून घेऊया या अभिनेत्यांची माहिती.  

सैफ अली खान

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने अनेक वर्षांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केले होते. सेक्रेड गेम्सशिवाय तो तांडवमध्येही दिसला होता. सैफ बॉलीवूडचा लोकप्रिय स्टार असल्याने ओटीटीवरील एका मालिकेसाठी करोडो रुपये घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने आतापर्यंत आलेल्या वेब सीरिजमध्ये 15 कोटी रुपये घेतले होते.

पंकज त्रिपाठी 
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीनेही अनेक सीरिजमध्ये काम केले आहे. मिर्झापूरमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरली. मिर्झापूरचे दोन सीझन आले होते. आता तीसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकजने मिर्झापूर 2 साठी 12 कोटी रुपये चार्ज केले होते.

बॉबी देओल
आश्रम वेब सीरिजमधून बाबा निरालाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओल सध्या खुपच चर्चेत आहेत. कारण आश्रमचा तीसरा सीझन येतोय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीरिजसाठी बॉबी देओलला 2 कोटी रुपये मिळाले आहेत.

मनोज बाजपेयी 
 द फॅमिली मॅन सारखी हिट मालिका देणारा मनोज बाजपेयी हा हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा चेहरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज बाजपेयीने द फॅमिली मॅन 2 साठी 10 कोटी रुपये घेतले होते. आता लवकरच मनोज द फॅमिली मॅन 3 मधून ओटीटीवर परतणार आहे.

अली फजल 
कालेन भैया व्यतिरिक्त मिर्झापूरचे आणखी एक पात्र खूप मनोरंजक होते. तो म्हणजे गुड्डू भैया, अली फजलने ही भूमिका साकारली होती. अली फजलने ही भूमिका साकारण्यासाठी प्रति एपिसोड 12 लाख रुपये आकारले होते.

जितेंद्र कुमार 
पंचायत वेब सीरिजने प्रसिद्ध झालेला जितेंद्र कुमार आता त्याच्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. त्याने प्रत्येक एपिसोडसाठी 50 हजार रुपये आकारले आहेत.