91st Academy Awards OSCARS 2019 : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकनं आहेत...

OSCAR 2019  यंदा ऑस्करचं हे ९१ वं वर्ष आहे. 

Updated: Feb 22, 2019, 01:15 PM IST
91st Academy Awards OSCARS 2019 : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकनं आहेत...  title=

लॉस एंजेलिस : OSCAR 2019  कला म्हटलं की असंख्य कलाकार आणि त्यांच्याकडे असणाऱ्या तितक्याच असंख्यं कला. विविध कलांच्या अशाच गर्दीत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी कला म्हणजे अभिनय. अभिनय म्हटलं की दिग्दर्शन आलं, दिग्दर्शन आलं की कथानक आलं, कथानकामागोमाग ओघाने आले लेखर, गीतकार, संगीतकार, निर्माते आणि चित्रपट. चित्रपटांच्या या विश्वात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या पुरस्कारांपैकी एक, म्हणजेच 'ऑस्कर'. आपल्या कारकिर्दीत एकदातरी ऑस्करच्या व्यासपीठावर जाऊन ती बाहुली हातात घेत अभिनंदनपर भाषण देण्याचं चित्रपट जगतात काम करणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्नं असतं. यंदा हेच स्वप्न साकारण्याची संधी अशा काही कलाकारांना मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचा ऑस्करही तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा खास असणार आहे. कारण, ऑस्कर यंदा शतकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहे. या पुरस्कारांचं यंदाचं हे ९१ वं वर्ष आहे. 

९१ व्या अकॅडमी पुरस्कार अर्थात यंदाच्या ऑस्करसाठी ब्लॅक पँथरपासून रोमापर्यंत अनेक चित्रपट शर्ततीत आहेत. या शर्यतीत द फेव्हरिट आणि रोमा या चित्रपटांना सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी दहा नामांकंनं मिळाली आहेत. जवळपास २२५ देशांमध्ये थेट प्रसारित होणाऱ्या ऑस्करची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. चला तर मग, एकदा नजर टाकूया यंदाच्या ऑस्कर पुरस्कारातील नामांकनाच्या यादीवर... 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

ब्लॅक पँथर
ब्लॅककेकेकेन्समन
बोहेमियन रॅपसडी
ग्रीन बुक 
द फेव्हरिट
रोमा
वाईस
अ स्टार इज बॉर्न 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 

अल्फोन्सो क्युरॉन- रोमा
स्पाईक ली - ब्लॅककेकेकेन्समन
ऍडम मॅकके - वाईस
योर्गोस लँथिमोस- द फेव्हरिट
पॉल पॉलीकॉव्स्की- कोल्ड वॉर 

सर्वोत्कृष्ट अभिनेता 

ख्रिस्टीअन बेल- वाईस
ब्रॅडली कूपर- अ स्टार इज बॉर्न 
विलियम दाफो- ऍट इटर्निटीज गेट
रामी मालेक- बोहेमियन रॅपसडी
विग्गो मॉर्टेंसन- ग्रीन बुक 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 

यलित्झा अपारिसिओ- रोमा
ग्लेन क्लोझ- द फेव्हरिट 
लेडी गागा- अ स्टार इज बॉर्न 
मेलिसा मॅककॅर्थी- कॅन यू एव्हर फरगीव्ह मी? 

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

ऍमी ऍडम्स- वाईस
मरिना दी तविरा- रोमा
रेगिना किंग- इफ बेल स्ट्रीट कुड टॉक 
एमा स्टोन- द फेव्हरिट
रॅचेल वेइझ- द फेव्हरिट 

सर्वेत्कृष्ट सहायक अभिनेता

महेर्शाला अली- द ग्रीन बुक 
ऍडम ड्रायव्हर- ब्लॅककेकेकेन्समन
सॅम ऍलिऑट- अ स्टार इज बॉर्न
रिचर्ड इ. ग्रँट- कॅन यू एव्हर फरगीव्ह मी? 
सॅम रॉकवेल- वाईस

सर्वोत्कृष्ट ऍनिमेडेट फिचर फिल्म 

इंक्रेडिबल्स २
आयल ऑफ डॉग्स 
मिरे
राल्फ ब्रेक्स द इंटरनेट 
स्पायडर मॅन : इनटू द स्पायडर वर्स

सर्वोत्कृष्ट छायांकन

कोल्ड वॉर
द फेव्हरिट 
नेव्हर लूक अवे 
रोमा
अ स्टार इज बॉर्न 

सर्वोत्कृष्ट वेशभूषा

द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्स
ब्लॅक पँथर 
द फेव्हरिट 
मेरी पॉपिन्स रिटर्न्स 
मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स 

सर्वोत्कृष्ट लघूपट (Best documentary feature nominees)

फ्री सोलो
हेल काऊंटी, धीस मॉर्निंग धीस इव्हिनिंग
मिडनाईट द गॅप 
ऑफ द फादर्स ऍण्ड सन्स 
आरबीजी 

सर्वोत्कृष्ट लघूपट (Best documentary short subject nominees)

ब्लॅक शीप 
एंड गेम 
लाईफबोट 
अ नाईट ऍट द गार्डन 
पिरियड. एंड ऑफ सेंटेंस

सर्वोत्कृष्ट संकलन 

ब्लॅककेकेकेन्समन
बोहेमियन रॅपसडी
द फेव्हरिट 
ग्रीन बुक 
वाईस 

सर्वोत्कृष्ट परभाषीय चित्रपट 

कॅपरनम (लेबनन)
कोल्ड वॉर (पोलंड)
नेव्हर लूक अवे (जर्मनी)
रोमा (मेक्सिको)
शॉपलिफ्टर्स (जपान)

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा 

बॉर्डर- (गोरन लुंडस्ट्रॉम आणि पामेला गोल्डमर)
मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स- (जेनी शिरकोर, मार्क पिल्चर आणि जेसिका ब्रूक्स)
वाईस- (ग्रेग कॅनम, केट बिस्को आणि पेट्रीसिया डेहनी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत 

लुडविग गोरान्ससन (ब्लॅक पँथर)
टेरेन्स ब्लॅन्कार्ड (ब्लॅककेकेकेन्समन)
निकोलस ब्रिटेल (इफ बेल स्ट्रीट कुड टॉक)
अलेक्झांडर डेस्प्लेट (आयल ऑफ डॉग्स)
मार्क शैमन (मेरी पॉपिन्स रिटर्न्स)

सर्वोत्कृष्ट संगीत (गीते)

ऑल द स्टार्स- ब्लॅक पँथर 
आइल फाईट- आरबीजी 
द प्लेस व्हेअर लॉस्ट थिंग्स गो- मेरी पॉपिन्स रिटर्न्स 
शॅलो- अ स्टार इज बॉर्न 
व्हेन अ काऊबॉय ट्रेड्स हिज स्पर्स फॉर विंग्स- द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्स

सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती 

ब्लॅक पँथर 
द फेव्हरिट 
फर्स्ट मॅन 
मेरी पॉपिन्स रिटर्न्स 
रोमा

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्टफिल्म 

डिटेन्मेन्ट 
फेव
मार्गरेट 
मदर
 स्किन

सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन 

बेंजामिन ए. बर्ट आणि स्टीव्ह बोडडेकर (ब्लॅक पँथर)
जॉन वॉरहर्स्ट आणि निना हार्टस्टोन (बोहेमियन रॅपसडी)
ए-लिंग ली आणि मिल्ड्रेड इट्राउ मॉर्गन  (फर्स्ट मॅन)
एतान व्हॅन डेर रिन आणि एरिक आडल (अ क्वाएट प्लेस) 
सर्जीओ डीआझ आणि लिव्हसे (रोमा)

सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण

स्टीव्ह बोडेडेकर, ब्रँडन प्रॉक्टर आणि पीटर डेव्हलिन (ब्लॅक पँथर)
पॉल मॅसे, टिम कॅवाजिन आणि जॉन कॅसाली (बोहेमियन रॅपसडी)
जॉन टेलर, फ्रँक ए. मोन्टॅनो, ए-लिंग ली आणि मेरी एच. एलिस (फर्स्ट मॅन)
लिव्हसे, क्रेग हेनघान आणि जोसे अँटोनियो गार्सिया (रोमा)
टॉम ओझानिच, डीन जुपॅनिक, जेसन रुडर आणि स्टीव्ह मोरो (अ स्टार इज बॉर्न)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट 

ऍव्हेंजर्स - इन्फिनिटी वॉर
क्रिस्तोफर रॉबिन
फर्स्ट मॅन
रेडी प्लेअर वन
सोलो- अ स्टार वॉर्स स्टोरी 

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)

द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्स 
ब्लॅककेकेकेन्समन
कॅन यू एव्हर फरगीव्ह मी? 
इफ बेल स्ट्रीट कुड टॉक
अ स्टार इज बॉर्न 

सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)

द फेव्हरिट 
फर्स्ट रिफॉर्म्ड 
ग्रीन बुक 
रोमा
वाईस