ZEE5 वर मनोरंजनाचा डबल धमाका, श्रीलंकेतील प्रेक्षकांचं ही करणार मनोरंजन

सार्क देशांमध्ये ZEE5 ठरला पहिला आंतरराष्ट्रीय करार करणारा ब्रँड

Updated: Feb 21, 2019, 05:16 PM IST
ZEE5 वर मनोरंजनाचा डबल धमाका, श्रीलंकेतील प्रेक्षकांचं ही करणार मनोरंजन title=

मुंबई : मनोरंजनाच्या विविध भाषांचा प्लॅटफॉर्म असलेल्या ZEE5 ने पहिल्यांदा आंतररष्ट्रीय स्तरावर भागीदारी केली आहे. ज्यामध्ये SAARC देशांचा प्रमुख कनेक्टिविटी प्रोवाईडर Axiata PLC आणि श्रीलंकेची मुख्य कनेक्टिविटीचा सहभाग आहे. या पार्टनरशिपमध्ये ViU app च्या अंतर्गत यूजर्सला 1,00,000 तास पर्यंत प्रीमियम रिजनल कंटेंट दिलं जाईल. डायलॉग ViU अॅपच्या सब्सक्राईबरला फक्त ३५० रुपये प्रति महिन्यात विविध भाषेतील सर्वोत्कृष्ट कंटेंट मिळणार आहे.

याशिवाय ZEE5 ची निर्मिती असलेली करनजीत कौर, झीरो केम्स सिरीज देखील पाहता येणार आहे. सोबतच क्राईम थ्रिलर- रंगबाज आणि अभय देखील पाहू शकता. इतकच नाही तर ग्राहकांना बॉलिवूडच्या हिट्स सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे. 

ZEE5चे मुख्य अधिकारी अर्चना आनंद यांनी म्हटलं की, आम्ही श्रीलंकेमध्ये ZEE5 लॉन्च करण्यासाठी डायलॉग एज़ियाटासोबत करार केला आहे. जेथे अनेक शैली आणि १२ भाषांमध्ये १ लाखाहून अधिक तासांचा कंटेंट आणि भारतातील सगळ्यात मोठ्या लायब्रेरीपर्यंत पोहोचता येणार आहे. श्रीलंकेचं एंटरटेनमेंट मार्केट झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता आम्ही संयुक्तरित्या डायलॉग ऐजिटाटासोबत संधी शोधण्यात तत्पर आहोत.'

डायलॉग एजियाटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगला हेटीअराचची यांनी म्हटलं की, 'आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही ZEE5 सोबत आंतरराष्ट्रीय करार केला आहे. याच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना सर्वोत्कृष्ट कंटेंट देऊ शकतो. श्रीलंकेतील लोकं आता कधीही कोठेही कोणत्याही भाषेतील कंटेंट पाहू शकता.'

ZEE5 जगभरात दक्षिण आशियातील १२ भाषांमधील १ लाखापेक्षा अधिकचे टीव्ही शो, सिनेमा, व्हिडिओ आणि इतर कंटेंट पुरवतो. ZEE5 Google Play Store, iOS App Store, www.ZEE5.com आणि Samsung Smart TV, Apple TV, Android TV आणि Amazon Fire TV वर देखील उपलब्ध आहे.

ZEE5 काय आहे?

ZEE5 हा Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) चा एक नवा ब्रांड आहे. जो डिजिटल एंटरटेनमेंट डेस्टिनेशन आहे. जो एक ग्लोबल मीडिया आणि एंटरटेनमेंट पावरहाउस देखील आहे. इंग्रजी, हिंदी, बंगाली, मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड, मराठी, उडिया, भोजपुरी, गुजराती आणि पंजाबी या सारख्या १२ भाषांमध्ये ZEE5 वर कंटेंट उपलब्ध आहे. या अॅपवर तुम्ही ६० पेक्षा अधिक टीव्ही चॅनेल लाईव्ह पाहू शकता. यामध्ये तुम्हाला ब्रेकिंग फीचर, सिनेमा, टीवी शो, संगीत, सिनेप्ले, लाईव टीव्ही आणि आरोग्य आणि लाईफ स्टाईल संबंधिक अनेक गोष्टी पाहायला मिळतील.

ZEEL काय आहे ?

Zee Entertainment Enterprises Ltd. (ZEEL) हा विविध प्रकारच्या प्रेक्षकांचं मंनोरजन करणारा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. १७३ हून अधिक देशांमध्ये हा पसरलेला आहे. जगभरातील १.३ बिलियन दर्शकांपर्यंत तो सध्या पोहोचतो आहे. ZEEL एक वेगळा ब्रँडचा अनुभव देतो. अनेकांचं तो मनोरंजन करतो आणि त्यांना प्रेरित देखील करतो.
 
ZEEL भारत आणि इतर देशांमध्ये प्रसारण, सिनेमा, संगीत, डिजिटल, लाईव मनोरंजन आणि थिएटर व्यवसायात आहे. ZEEL कडे २,६०००० हून अधिक तासांचं टेलीव्हीजन कंटेंट उपलब्ध आहे. जगातील सगळ्यात जास्त हिंदी सिनेमांचं कंटेंट आणि विविध भाषेतील ४८०० हून अधिकचे सिनेमे यांच्याकडे आहे. ZEEL ने अनेक सिनेमांची देखील निर्मिती केली आहे. भारतात सर्वात जलद गतीने वाढणारा हा ब्रँड आहे. ZEE5 च्या माध्यमातून आता त्याने डिजिटल क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे.