ऑस्करमध्ये झालेल्या प्रकारानंतर विल स्मिथ ढसाढसा कॅमेरासमोर का रडला?

जगातील सगळ्यात प्रतिष्ठित आणि सगळ्यात मोठा पुरस्कार ऑस्कर 2022 हा  नुकताच जाहीर झाला आहे.

Updated: Mar 28, 2022, 10:11 PM IST
ऑस्करमध्ये झालेल्या प्रकारानंतर विल स्मिथ ढसाढसा कॅमेरासमोर का रडला? title=

मुंबई : जगातील सगळ्यात प्रतिष्ठित आणि सगळ्यात मोठा पुरस्कार ऑस्कर 2022 हा  नुकताच जाहीर झाला आहे. आज सकाळी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये  94 व्या अकादमी पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुरस्कार कार्यक्रमात असं काही घडलं. ज्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. हे प्रकरण सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथशी संबंधित आहे. ज्याने होस्ट ख्रिस रॉकला कानाखाली मारली होती.

क्रिस रॉकच्या मारली कानाखाली 
खरंतर, विल स्मिथने ख्रिस रॉकला थप्पड मारली. सुरुवातीला या घडलेल्या प्रकाराला हा एक स्क्रिप्टेड भाग असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हे प्रकरण स्क्रिप्टच्या पलीकडे होतं. या सगळ्या प्रकरणानंतर  विल स्मिथने अकादमीची जाहीरपणे माफी मागितली आहे. 

विल स्मिथचं विधान
ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथ रडत माफी मागत म्हणाला,"मला अकादमीची माफी मागायची आहे. मला माझ्या सहकारी नामांकित व्यक्तींचीही माफी मागायची आहे. माझ्यासाठी हा खूप खास आणि सुंदर क्षण आहे आणि मी माझा पुरस्कार जिंकल्याच्या आनंदावर रडत नाहीये. तर मला या क्षणी आनंदी असलेल्या एका वेड्या वडिलांसारखं वाटतं. प्रेम तुम्हाला सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतं."

काय आहे संपूर्ण प्रकरण 
 होस्ट ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा हिच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली आणि सांगितलं की, याच कारणामुळे त्याला G.I हा चित्रपट तिला मिळाला. . या चित्रपटासाठी जाडाने तिचे केस कापले नाहीत, ती अलोपेसियाशी झुंज देत आहे. ज्यामुळे तिला टक्कल आहे. आणि याच रागात विल स्मिथने  ख्रिस रॉकच्या भर सोहळ्यात कानाखाली मारली होती.