‘ओरू अदार लव्ह’च्या निर्मात्याने घेतला सर्वात मोठा निर्णय

सध्या तरुणांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर प्रिया प्रकाशचीच जादू आहे. ज्या व्हिडिओतील ही क्लिप व्हायरल झाली होती तो ट्रेलरही मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 18, 2018, 01:32 PM IST
‘ओरू अदार लव्ह’च्या निर्मात्याने घेतला सर्वात मोठा निर्णय  title=

नवी दिल्ली : सध्या तरुणांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर प्रिया प्रकाशचीच जादू आहे. ज्या व्हिडिओतील ही क्लिप व्हायरल झाली होती तो ट्रेलरही मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे.

यूट्यूबवर याचे व्ह्यूज खूप वाढले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियाचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे झाला. रातोरात प्रसिद्ध झालेली ही व्हायरल गर्ल सध्या त्रिशूर येथील विमला कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

ओरू अदार लव या चित्रपटात ती एका विद्यार्थीनीची भूमिका साकारत आहे.

मल्याळम सिनेमा ‘ओरू अदार लव्ह’चा ट्रेलर १.५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. यूट्य़ूबवर अपलोड झालेल्या व्हिडिओतून कमाईची आकडेवारी एका वेबसाईटने जारी केली आहे.

किती झाली कमाई?

सोशल ब्लेड ही ती वेबसाईट आहे. त्यांच्यानुसार हा व्हिडिओ अपलोड करणा-या यूट्यूब चॅनलने ७६०० डॉलर ते ६०८०० डॉलरची कमाई केली आहे.

भारतीय मुद्रेत ही रक्कम ५ लाख ते ३९ लाख रूपये इतकी आहे. या चॅनलने प्रिया प्रकाशच्या सिनेमातील आणखी एक टीझर अपलोड केलाय.

सोशल ब्लेडच्या आकडेवारीनुसार टीझरमुळे १७००-१३७०० डॉलर म्हणजेच १.१० लाख रूपये ते ८.८ लाख रूपयांपर्यंत कमाई केली गेली आहे.

ऋषी कपूर ट्विट 

अभिनेते ऋषी कपूर हे देखील प्रियाच्या अदांचे दिवाने झाले आहेत. त्यांनी प्रियासाठी ट्विट केलयं. 'मी प्रियाच्या स्टारडमची भविष्यवाणी करतोय.

ती एक्सप्रेशन खूप चांगल्या पद्धतीनं आणते. नखरेबाज असूनही इनोसंट आहे. असे ट्विट त्यांनी केले. तर माझ्या वेळेत तू नव्हतीस ? असेही मस्करीत म्हटलेय.

१ कोटींचा खर्च 

 दरम्यान सिनेमाचे डबिंग राईट्स विकले गेले आहेत. या सिनेमावर आतापर्यंत १ कोटीचा खर्च आला. 

मालकी हक्क २ कोटींना विकले 

 प्रिया प्रकाशच्या या सिनेमाचे मालकी हक्क विकले गेलेयत. निर्मात्याने याला २ कोटी रुपयांना विकल्याचे सांगितले जात आहे. पण ही डिल होण्याआधीच सर्वांनी याचे हिंदी वर्जन यूट्यूबवर व्हायरल केलयं.

यामध्ये ठरली अव्वल 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार प्रिया प्रकाश गुगल सर्चमध्ये अव्वल ठरली आहे. तिने चक्क सनी लियोनीला मागे टाकले आहे.

तिची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त सनीच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफलाही तिने मागे टाकले आहे.

ती याच्यासाठी वेडी

प्रियाला स्पोर्ट्सची आवड असल्याचे तिने सांगितले. इतकंच नाही तर एका मुलाखतीत तिने सांगितले की, क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिला प्रचंड आवडतो.