'लव आज कल 2' सिनेमाच्या सेटवरून सारा-कार्तिकचा फोटो व्हायरल

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान त्यांच्या बहुप्रतिक्षीत सिनेमाच्या शूटिंगसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. 

Updated: Mar 11, 2019, 01:24 PM IST
'लव आज कल 2' सिनेमाच्या सेटवरून सारा-कार्तिकचा फोटो व्हायरल  title=

मु्ंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान त्यांच्या बहुप्रतिक्षीत सिनेमाच्या शूटिंगसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. दिग्दर्शक इम्तियाझ अली दिग्दर्शित 'लव आज कल 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये दोघे व्यग्र आहेत. काहीदिवसांपूर्वी सारा दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चॅट शोमध्ये सारा उपस्थित होती. साराने या शोमध्ये एक महत्वपूर्ण खुलासा केला होता. ती म्हणाली, 'माला कार्तिक फार आवडतो आणि मला त्याला डेट करायला नक्कीच आवडेल' कार्तिकनेही तिच्या चा वक्तव्यावर सहजतेने उत्तर दिले. तो म्हणाला , 'मी साराचे वडील सैफ अली खान यांच्या पाऊलावर पाय ठेवत काम करण्याचा प्रयत्न करत आहे.' आतापर्यंत करणच्या चॅट शोमध्ये अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली. या प्रश्न-उत्तरांच्या खेळात अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील खाजगी गोष्टींचा स्वीकार केला आहे.

 

'लव आज कल 2' सिनेमाची शूटिंग दिल्लीत होत आहे. काहीदिवसांपूर्वी कार्तिक -साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर आता 'लव आज कल २' सिनेमाच्या सेट वरून त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ते दोघे एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. 'लव आज कल २' सिनेमाच्या माध्यमातून कार्तिक आणि सारा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. 

सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'लव आज कल २' सिनेमा 'लव आज कल' सिनेमाचा सिक्वल असणार आहे. 'लव आज कल' सिनेमा १० वर्ष आधी प्रदर्शित झाला असून चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.