ऋषी कपूर दिव्यासाठी 'दिवाना' सेटवरचं केलं किस; त्यानंतर मात्र...

'दिवाना' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं; पण...

Updated: Jun 26, 2021, 10:41 AM IST
ऋषी कपूर दिव्यासाठी 'दिवाना' सेटवरचं केलं किस; त्यानंतर मात्र... title=

मुंबई : बॉलिवूडने प्रेक्षकांना असे अनेक चित्रपट दिले आहेत, जे आजही चाहते तितक्याचं उत्सुकतेने पाहातात. अशाचं चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे अभिनेते ऋषी कपूर, आणि अभिनेत्री दिव्या भारती स्टारर 'दिवाने' चित्रपट. अभिनेता शाहरूख खान देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. हा शाहरूखचा पहिलाचं चित्रपट. चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहांबाहेर एकचं गर्दी केली होती. या चित्रपटासंबंधी अनेक असे किस्से असे आहेत, जे अद्यापही  अनेक लोकांना माहिती नाही. 

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिव्या भारती यांच्यासोबत एक अशी घटना घडली ज्यानंतर त्यांनी कधीचं ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली नाही. तेव्हा दिव्या भारती सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. चित्रीकरणादरम्यान दिव्या भारती  यांचं सौंदर्य पाहून ऋषी कपूर यांचं नियंत्रण सुटलं. सीनमध्ये दिव्या आणि ऋषी यांना एक किसिंग सिन द्यायचं होतं. 

तेव्हा ऋषी यांनी दिव्या यांना बळजबरीने किस केलं. तेव्हा दिव्या घाबरल्या आणि तिथून पळून गेल्या. त्या फार घाबरल्या होत्या. तेव्हा दिग्दर्शक राज कंवर यांनी दिव्या यांची समज घातली आणि पुन्हा चित्रीकरण सुरू करण्यास विनंती केली. त्यानंतर दिव्या आणि ऋषी कधीचं एकत्र दिसले नाहीत. 

साजिद नाडियादवाला यांच्यासोबत लग्न केल्यानंतर 5 एप्रिल 1993 रोजी त्यांनी आत्नहत्या केली. तर ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला.