OMG! कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ; जटाधारी रुपातील 'या' अभिनेत्याला पाहून अंगावर काटा

Akshay Kumar Oh My God 2: अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानं इन्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 9, 2023, 11:24 AM IST
OMG! कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ; जटाधारी रुपातील 'या' अभिनेत्याला पाहून अंगावर काटा title=
June 9, 2023 | Oh my god 2 movie poster release by akshay kumar on instagram netizens reacts (Photo: Akshay Kumar Instagram)

Akshay Kumar Oh My God 2: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाची. अक्षय कुमार यानं काही दिवसांपुर्वी आपल्या केदारनाथच्या दर्शनाचे आणि उत्तराखंडमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावेळी त्यानं आपल्या आगामी चित्रपटाचे शुटिंग संपल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोबतच आता त्यानं अजून एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्यानं आपल्या आगामी 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यावेळी त्याच्या या पोस्टरवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे या पोस्टरवरून समजते आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, या दिवशी रणबीर कपूरचा 'अॅनिमल' आणि सनी देओलचा 'गदार 2' हा चित्रपटही क्लॅश होतो आहे. त्यामुळे त्याच दिवशी प्रेक्षकांसाठी चित्रपटांची चांगलीच मेजवानी असली तरी यादिवशी चित्रपट क्लॅश होणार असल्याने बॉक्स ऑफिसची गणितं काय असणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागून राहिली आहे. यावेळी आपल्या पोस्टमध्ये अक्षयनं लिहिलं आहे की, आ रहे हैं हम, आइयेगा आप भी. 'ओह माय गॉड 2' लवकरच चित्रपटगृहात. 'ओह माय गॉड 2' सध्या त्याच्या या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत व त्याचसोबत त्याच्या चाहत्यांनीही त्याच्या या आगामी चित्रपटावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

यावेळी या चित्रपटातून पंकज त्रिपाठी, यामी गौतम अक्षय कुमार यांच्यासोबत झळकणार आहेत. 2021 मध्ये अक्षय कुमारनं आपल्या या आगामी 'ओह माय गॉड 2' चित्रपटाची पहिली घोषणा केली होती. त्यामुळे त्याची सगळीकडेच चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा आता अक्षय कुमारनं आपल्या या आगामी चित्रपटाची रिलिज डेट घोषित केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे. आता कधी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शत होतोय याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. 

हेही वाचा - तुझ्या रूपाचं चांदणं! 26 वर्षांनंतर 'टायटॅनिक'ची रोझ पाहा किती बदलली...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षय कुमार हा आपल्या आगळ्यावेगळ्या चित्रपटांनी कायमच प्रेक्षकांना सरप्राईज करत असतो. आता त्यांच्या या पोस्टरनं त्यानं आपल्या चाहत्यांना चांगलंच सरप्राईज केलं आहे. गेल्या वर्षी अक्षय कुमारचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते परंतु ते बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवू शकले नाहीत.