न्यासा देवगणची लंडनमध्ये लेट नाईट पार्टी; बेस्ट फ्रेंडसोबतचा 'तो' फोटो व्हायरल

Nysa Devgan Party Photos: काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण ही नेहमीच आपल्या हटके लुक आणि फॅशनसाठी (Kajol Daughter) ओळखली जाते. सध्या तिचे पार्टीतले फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तिनं कॅमेऱ्यासोबत हटके पोझ दिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 21, 2023, 09:08 PM IST
न्यासा देवगणची लंडनमध्ये लेट नाईट पार्टी; बेस्ट फ्रेंडसोबतचा 'तो' फोटो व्हायरल title=
(Photo - Orry / Instagram)

Nysa Devgan Party Photos: न्यासा देवगण सध्या पार्टीमूडमध्ये दिसते आहे. अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा अनेक पार्टी (Nysa Devgan Party Photos in Londan) आणि मित्रमैत्रीणींसोबत परदेशात एन्जॉय करताना दिसते. सध्या तिचे असेच काही फोटोज हे चर्चेत आले आहेत. लंडनमध्ये पार्टीमध्ये लुब्ध झालेले ही मंडळी आपली मे महिन्यातील सुट्टी चांगलीच एन्जॉय करताना दिसत आहेत. सध्या त्यांचे काही फोटोज हे सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. (Nysa Devgan enjoys party in london with friends photos goes viral)

यावेळी न्यासा आपल्या मित्रमैत्रीणींसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसली आहे. मध्यंतरी आपल्या फॅशनमुळे न्यासा प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली होती. दररोज बोल्ड फॅशनमध्ये दिसणारी न्यासा मंदिरात पूजेला गेल्यावर साध्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसल्यामुळे तिला पू टू पार्वती म्हणत ट्रोलही करण्यात आले होते.

परंतु न्यासाची इंटरनेटवर चांगली चर्चा रंगलेली दिसते. यावेळी तिनं आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत (Nysa Devgan Photos) मस्त मौजमज्जा केली आहे. यावेळी न्यासानं आपला लाडका मित्र ओरहान ओवत्रमणी सोबत नाईट पार्टी एन्जॉय केली आहे. लेट नाईट पार्टीमध्ये त्यांचे अजूनही काही मित्र सामील होतं. त्यांचे हे फोटोज ओरहान म्हणजेच ऑरीनं इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या ते सगळीकडेच व्हायरल होत आहेत. यावेळी न्यासाच्या अदाकारीवर चाहते घायाळ झाले आहेत. यावेळी त्यांच्या या फोटोंवरून कळते आहे की न्यासा आणि मंडळींनी यावेळी पार्टी ही चांगलीच एन्जॉय केली आहे. यावेळी ऑरीसोबत तिनंही खास फोटोज शेअर केले आहेत. यावेळी तिचेही काही टायर्ड फोटोज ऑरीनं शेअर केले आहेत. ज्यात ती जराशी दमलेली वाटते आहे.  

हेही वाचा -  अनुराग कश्यपला मुलीच्या लग्नाची चिंता... म्हणाला, ''तिच्या लग्नासाठी मला...''

सेलिब्रेटींची मुलं ही अनेकदा एकमेकांसोबत वेकेशन आणि पार्टीला एकत्र जाताना दिसतात. यावेळी ते एकमेकांसोबत चांगला कॉलिटी टाईम स्पेंड करतात. सध्या न्यासाचे हे फोटो पाहूनही तसेच वाटते आहे, यावेळी त्यांनी लंडनच्या एका महागड्या क्लबमध्ये पार्टी केली आहे. न्यासा यावेळी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तर ऑरी पिच कलरच्या शर्टमध्ये दिसला होता. न्यासानं सिंगापूर आणि मग स्विझर्लंड येथून आपलं शिक्षण घेतलं आहे. न्यासा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. न्यासानं काही दिवसांपुर्वी आपला 20 वा वाढदिवस (Nysa Devgan 20th Birthday) साजरा केला होता. तिच्या वाढदिवसाचे फोटोजही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऑरी हाही एक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. तो अनेकदा बॉलिवूड सेलिब्रेटींच्या (Who is Orry) गोतावळ्यात वावरताना दिसतो. मध्यतंरी राधिका मर्चंटसोबतही व्हेकेशनला दिसला होता. त्यांचेही फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.