अनुराग कश्यपला मुलीच्या लग्नाची चिंता... म्हणाला, ''तिच्या लग्नासाठी मला...''

Anurag Kashyap on His Daughter Wedding: सेक्रेट गेम्सचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या लेकीनं नुकतीच एक पोस्ट (Anurag Kashyap Post) सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी आपल्या लेकीच्या लग्नाचे खूपच टेंशन घेतल्याचे दिसते आहेत. अनुराग कश्यप यांच्या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 21, 2023, 08:31 PM IST
 अनुराग कश्यपला मुलीच्या लग्नाची चिंता... म्हणाला, ''तिच्या लग्नासाठी मला...'' title=
फाईल फोटो

Anurag Kashyap on His Daughter Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा मोहोल दिसतो आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रेटी हे विवाहबंधनात अडकताना तरी दिसत आहे किंवा काही सेलिब्रेटींनी आपला साखरपुडा तरी उरकला आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra Engagement) यांचा साखरपुडा दिमाख्यात पार पडला. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिनं यावेळी आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी खास हजेरी लावली होती. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. परिणीतीच्या साखरपुड्यानंतर आता बॉलिवूडमधील एका दिग्गज आणि लोकप्रिय दिग्दर्शकाच्या लेकीनं बाली येथे गुपचूप साखरपुडा उरकला आहे. 

'सेक्रेड गेम्स' या वेबमालिकेचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप हिनं (Aaliyah Kashyap) बाली येथे आपल्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला आहे. तिनं काल याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टखाली तिच्या आणि अनुराग कश्यपच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांनीही तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टखाली अनुराग कश्यपनंही कमेंट केली आहे. त्यानं तीन हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. 

हेही वाचा - अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा बोल्ड अवतार; शरद पोंक्षेंची कमेंट वाचलीत का? 

परंतु आता आलियाच्या या पोस्टनंतर (Anurag Kashyap at Cannes) अनुरागची पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. या पोस्टमध्ये त्यानं आपल्या मुलीच्या लग्नाविषयी कॅप्शनमध्ये एक कमेंट केली आहे. या पोस्टखालीदेखील नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स येताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं आहे की, ''त्यानं @cinemakasam या युझरला टॅग करत लिहिलं आहे की, अरे निदान येथे तरी फोन सोड (अनुराग कश्यपसह दोन अजून व्यक्ती त्याच्यासोबत त्यानं पोस्ट केलल्या फोटोमध्ये दिसत आहेत. यावेळी अनुराग फोनमध्ये नाक खुपसून बसला आहे. त्याला उद्देशून हे समोरची व्यक्ती त्याला म्हणते की निदान येथे आल्यावर तरी फोन सोड! त्यावर अनुराग पुढे म्हणतो...) ही व्यक्ती माझ्यावर चिडली आहे. परंतु त्याला कल्पना नाही की येथे बसून मी माझ्या लेकीच्या लग्नाचा हिशोब लावतो आहे.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तु पुढे म्हणतो की, ''माझ्या लाडक्या @aaliyahkasyap साठी मला न जाणे किती रिमेक बनवावे लागणार आहेत या मी हिशोब लावतो आहे. खरंतर माझ्या लेकीनं तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिनं साखरपुडा उरकवला आहे. तेव्हा आता येथे कान्समध्ये बसून मला ती बातमी कळाली आहे.''यावेळी अनुराग कश्यप हा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या 'केनेडी' (Kennedy) या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आला आहे.