अजय देवगणकडून मुलगी न्यासाच्या डेब्यूबद्दल इशारा

बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Updated: Apr 12, 2022, 08:11 PM IST
अजय देवगणकडून मुलगी न्यासाच्या डेब्यूबद्दल इशारा title=

मुंबई : बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याच दिवसांपासून न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. आता तिचे वडील अजय देवगण यांनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.

न्यासा बॉलिवूडमध्ये कधी करणार पदार्पण ?
अजय देवगणने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'मला माहित नाही की तिला या लाईनमध्ये यायचं आहे की नाही. आतापर्यंत तिने कोणताही इंट्रेस्ट दाखवला नाही, मात्र मुलांसोबत कधीही काहीही बदलू शकतं. सध्या ती बाहेर राहून अभ्यास करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रनवे 34 या दिवशी होणार रिलीज 
आजकाल अजय देवगण त्याच्या नवीन चित्रपट 'रनवे 34'मुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो मुख्य अभिनेता आहे आणि त्याने स्वतः दिग्दर्शनही केलं आहे. याआधी 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'शिवाय' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 'रनवे 34'मध्ये अजय देवगण कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.