सलमान खानच नाही 'हे' स्टारही ऐश्वर्या रायचे कट्टर शत्रू

सालमनान शिवाय बॉलिवूडच्या 'या' तीन आघाडीच्या अभिनेत्रींसोबत ऐश्वर्याचं वैर   

Updated: Jul 19, 2022, 03:49 PM IST
सलमान खानच नाही 'हे' स्टारही ऐश्वर्या रायचे कट्टर शत्रू title=

मुंबई : झगमगत्या दुनियेत भांडण, तंडा, वाद, मैत्री, शत्रूत्व इत्यादी गोष्टी सर्रास पाहायला आणि ऐकायला मिळतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या बॉलिवूडपासून दूर असली, तर इंडस्ट्रीमधील अनेकांसोबत अभिनेत्रीचे वाद आहेत. फक्त अभिनेता सलमान खान नाही तर, काही अभिनेत्रींसोबत ऐश्वर्याचा छत्तीसचा आकडा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या शत्रूंची यादी

अभिनेत्री करीना कपूर खान
बॉलिवूडची बेबो अर्थातचं करीना कपूर खान कायम तिच्या बोल्ड अदा आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कलाविश्वात ऐश्वर्या आणि करीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण दोघी प्रसिद्ध अभिनेत्रींमधील नातं काही ठिक नाही. 

अभिनेत्री राणी मुखर्जी
हिंदी कलाविश्वात राज्य करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्यामधील नातं काही ठिक नाही. ऐकेकाळी दोघी सख्या मैत्रिणी होत्या, पण 'चलते-चलते' चित्रपटानंतर त्यांची मैत्रीने एक नवं वळण घेतलं. सर्वप्रथम चित्रपटात ऐश्वर्या राय झळकणार होती. पण ऐश्वर्याला न सांगता राणीने चित्रपट साईन केला. 

अभिनेत्री सोनम कपूर 
एकदा सोनम कपूरने एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याला आंटी म्हणून हाक मारली. तेव्हापासून दोघी प्रसिद्ध अभिनेत्रींमधील नात्याल ब्रेक लागला. 

अभिनेता सलमान खान 
ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. दोघांमधील मैत्री देखील आता शिल्लक राहिलेलं नाही. पाहायला गेलं तर आता ऐश्वर्या आणि सलमान दोघेही त्यांच्या आयुष्यातील सर्व काही विसरून पुढे निघून गेले आहेत.