'त्या' गोष्टीनंतर अभिनेत्रीच्या शरीरात अनेक बदल, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...

व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या शरीरात पूर्वीसारखी...'  

Updated: Jul 19, 2022, 03:19 PM IST
'त्या' गोष्टीनंतर अभिनेत्रीच्या शरीरात अनेक बदल, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली... title=

मुंबई : रिअॅलिटी शो, नृत्यदिग्दर्शन आणि मग मालिकांमधील आघाडीती अभिनेत्री अशी आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणारी एक अभिनेत्री मोहिना कुमारी सिंह सध्या मातृत्त्वाचा आनंद घेत आहे. तीन महिन्यांपूर्वी मोहिनाने मुलाला जन्म दिला. मोहिना मुलासोबत कायम फोटो पोस्ट करत असते. दरम्यान आई झाल्यानंतर शरीरात झालेल्या बदलांबद्दल मोहिनाने उघडपणे सांगितलं आहे. 

एक व्हिडीओ शेअर करत मोहिना म्हणाली, 'प्रेग्नेंसीच्या पूर्ण प्रवासामध्ये शरीरात अनेक बदल झाले आहेत. माझं वजन फार वाढल आहे. माझ्या शरीरात पूर्वीसारखी ऊर्जा राहिलेली नाही. पण रोज मेहनत केल्याने माझ्यातील उत्साह परत येईल. डान्स माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे.' असं देखील मोहिना म्हणाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या मोहिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोहिनाने स्वतःचा वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केला आहे. नुकताचं 15 जुलै रोजी, मोहिनाचा मुलगा अयांशच्या जन्माला तीन महिने पूर्ण झाले आहेत, याची माहिती मोहिनाने इंस्टाग्रामवर मुलासोबतचा एक गोंडस फोटो शेअर करून दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून मोहिना सर्वांसमोर आली होती. एक राजकुमारी असल्याचं तिने याच कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं. रिअॅलिटी शोनंतर मोहिनाने नृत्यदिग्दर्शन क्षेत्रात करिअर केलं. ज्यानंतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून तिचं अभिनय कौशल्यही प्रेक्षकांना पाहता आलं. 

पण लग्न झाल्यानंतर कलाविश्वातून काढता पाय घेतला आहे. सुयश रावत याच्याशी काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2019 मध्ये मोहिनाने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.