समुद्र किनारी नोरा फतेहीची बोल्ड लूक, फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आणि चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

Updated: Feb 12, 2022, 08:12 PM IST
समुद्र किनारी नोरा फतेहीची बोल्ड लूक, फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आणि चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. क्वचितच असा दिवस जातो की नोरा तिच्या हॉटनेसने चाहत्यांना वेड लावत नसेल. अभिनेत्री तिच्या इंस्टाग्रामवर हॉट आणि सिझलिंग फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकत असते.

अलीकडेच नोराने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचे काही मस्त फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची किलर फिगर दिसत आहे. नोराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या, पिवळ्या आणि केशरी रंगाच्या ट्रान्सपरंट वन-पीसमध्ये दिसत आहे. तर पुढच्या बूमरँग व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिची फिगर फ्लॉंट करत आहे.

नोराने नुकताच तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेत्रीने वाढदिवस कसा साजरा केला याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले नसले तरी नंतर तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची अजय देवगणच्या भुज या चित्रपटात दिसली होती. त्याचबरोबर, नुकतंच नोराचं 'नाच मेरी रानी' हे गाणं रिलीज झालं आहे जे पंजाबी गायक गुरु रंधावाने गायलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.