बापरे ! इतकं महागडं गिफ्ट, राकेश बापटमुळे शमिता शेट्टीचा Valentine बनला खास

 व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि अशावेळी लव्हबर्ड्स एकमेकांचे लाड पुरवत आहेत.

Updated: Feb 12, 2022, 08:03 PM IST
बापरे ! इतकं महागडं गिफ्ट, राकेश बापटमुळे शमिता शेट्टीचा Valentine बनला खास title=

मुंबई : व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि अशावेळी लव्हबर्ड्स एकमेकांचे लाड पुरवत आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देत आहेत. आता राकेश बापट आणि शमिता शेट्टीच घ्या, हे जोडपे एकत्र व्हॅलेंटाईनसाठी शॉपिंग करत आहेत. ते नुकतेच एका ज्वेलरी शॉपबाहेर एकमेकांचा हात धरून दिसले.

यावेळी लव्हबर्ड्स पांढऱ्या कलरच्या ड्रेसमध्ये मॅचिंग करताना दिसले.  क्लासी आणि शोभिवंत शमिता शेट्टी पांढऱ्या ब्लेझरसह पांढऱ्या पलाझो पॅन्टमध्ये दिसली. तिचा प्रियकर राकेश बापट पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या कॅज्युअलमध्ये दिसला. दोघांनी एकमेकांचा हात धरून हसत पापाराझीसाठी पोज दिली.

दोघांनी मिळून ज्वेलरी स्टोअरला भेट दिली. ज्वेलरी स्टोअरच्या आतील फोटो देखील समोर आली आहेत, ज्यामध्ये शमिता शेट्टी गळ्यात चेन घालताना दिसत आहे. त्याचवेळी राकेश गर्लफ्रेंडचं कौतुक करताना दिसला.

हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांचा असा अंदाज होता की,  राकेशने त्याची प्रेयसी शमिता शेट्टीला खास व्हॅलेंटाईन गिफ्ट दिले आहे. त्यांनी शमिता शेट्टीला हिऱ्यांचे दागिने भेट दिले आहेत. मात्र, या चर्चेवर अद्याप दोघांची प्रतिक्रिया आलेली नाही.