मुंबई : डान्सिंग सेंसेशन नोरा फतेही तिच्या डान्स व्हिडिओ तसंच फॅशन सेन्सवर वर्चस्व गाजवते. आता पुन्हा एकदा नोरा फतेहीचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आजकाल नोरा 'डान्स दिवाने ज्युनियर' या रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा पापाराझींनी व्हॅनिटी व्हॅनमधून शोच्या सेटवर नोराला पाहिलं तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.
बॉडीकॉन लूकमध्ये परी
यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत नोराच्या लेटेस्ट लूकचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये नोरा ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये परीसारखी दिसत आहे. मात्र, नोराचा हा ड्रेस इतका घट्ट आणि लांब होता की, तिला चालतानाही खूप अडचणींचा सामना करावा लागला.
दोन लोकांनी उचलला ड्रेस
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोराचा ड्रेस दोन लोकांना उचलावा लागला, त्यानंतर ती व्यवस्थित चालू लागली. यासोबतच नोरा यावेळी खूप क्यूट एक्सप्रेशन देताना दिसत आहे. नोरा दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरसोबत हा शो होस्ट करतेय.