'चादर घेऊन आली...', Nora Fatehi चा ड्रेस पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Nora Fatehi Trolled Over Her Fashion : नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील नोराची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नोरा तिच्या फॅशनमुळे ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही या आधीही ती बऱ्याचवेळा ट्रोल झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 9, 2023, 12:46 PM IST
'चादर घेऊन आली...', Nora Fatehi चा ड्रेस पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Nora Fatehi Trolled Over Her Fashion : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या डान्समुळे चर्चेत असते. याशिवाय नोरा चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे तिचा फॅशनं सेन्स. नोराचा नुकताच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोराची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (Nora Fatehi Troll) 

नोराचा हा व्हिजीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत नोरानं या व्हिडीओत पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नोराच्या या ड्रेसचे स्लीव्ह्सनं लक्ष वेधलं आहे. नोरानं पांढऱ्या रंगाचे ग्लव्स आणि एक छोटी हॅंड बॅग दिसत आहे. तर नोराचा ड्रेस काही लोक सतत ठीक करताना दिसत आहे. तर नोरा कॉन्फिडन्समध्ये पापाराझींना पोज देताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Nora Fatehi Viral Video) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'मॅम माझी उशी परत द्या. मला झोपायचं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'शेविंग फोम आणि त्याच्यामध्ये हे रेझर आहे असं दिसतय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तिला खूप ताप आला आहे. तर डॉक्टरांनी तिला सगळीकडे जाताना चादर घेऊन जाण्यास सांगितले आहे, म्हणून ती अशी आली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'चांद छुपां बादलमें हे गाणं तिनं खूप सीरिअसली घेतलं. पण खऱ्या आयुष्यात ती चांद नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आपल्या सुरक्षेसाठी एअर बॅग्स खूप महत्त्वाच्या आहेत.' इतकंच नाही तर या सारख्या अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा : 'अनोळखी महिला आली अन् माझ्या मुलीला जबरदस्ती...', Preity Zinta नं सांगितले दोन धक्कादायक अनुभव

नोराच्या कामाविषयी बोलायचं  झालं तर नोराचं नुकतंच 'अच्छा सिला दिया मेरे प्यार का' हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यानं तिच्या चाहत्यांना वेड लावलं आहे हे म्हणायला हरकत नाही. कारण नोराच्या डान्सिंग स्किल्स अप्रतिम आहे. नोरानं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कतार फीफा वर्ल्ड 2022 कपच्या क्लोझिंग सेरेमनीमध्ये पर्फॉर्मन्स केलं होतं. या व्यतिरिक्त ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगणच्या थॅंक गॉड या चित्रपटात दिसली होती. नोरानं बाहुबली, सत्यमेव जयते आणि मरजावां या चित्रपटांमध्ये आयटन सॉन्गवर डान्स केला आहे. तर या चित्रपटांमधील तिची गाणी लोकप्रिय ठरली होती.