Ravanasura Box Office Collection Day 1: 'रावणसुरा'नं 'भोला' आणि 'दसरा' चित्रपटांना टाकलं मागे, इतक्या कोटींचा जमवला गल्ला!

Ravanasura Box Office Collection Day 1: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'रावणसुरा' (Ravansura) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी तगडे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) जमवले आहे. तेव्हा या चित्रपटाच्या या हटके कमाईनं अक्षरक्ष: पिछाडीवर टाकलंय. तेव्हा जाणून घेऊया रावणसुराचं (Ravansura Release Date) लेटेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन.  

गायत्री हसबनीस | Updated: Apr 9, 2023, 12:46 PM IST
Ravanasura Box Office Collection Day 1: 'रावणसुरा'नं 'भोला' आणि 'दसरा' चित्रपटांना टाकलं मागे, इतक्या कोटींचा जमवला गल्ला!  title=

Ravanasura Box Office Collection Day 1: सध्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा आता प्रादेशिक म्हणजे रिजिनल चित्रपटांची (Ravansura Movie Review) क्रेझ वाढू लागली आहे. त्यातून 'पुष्पा' या चित्रपटाच्या घसघशीत यशानंतर आता 'पुष्पा 2' (Pushpa 2) येण्यास सज्ज झाला आहे. बॉलिवूड चित्रपटांचीही चांगली क्रेझ सध्या पाहायला मिळते आहे. 'भोला' (Bholaa) या चित्रपटानंही चांगल्या प्रकारे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन जमवलं आहे. 'दसरा' (Dassara Movie) या चित्रपटानंही मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिसवर गल्ला भरला आहे.

परंतु या चित्रपटांना टक्कर द्यायला रवि तेजा (Ravi Teja) यांचा 'रावणसुरा' हा चित्रपट आला आहे. या चित्रपटानं तर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. तेव्हा जाणून घेऊया रावणसुरा चित्रपटाचे लेटेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन काय आहे? (Ravanasura Box Office Collection Day 1 ravi teja ravansura movie has collection 6 crore rupees on opening day)

7 एप्रिल रोजी 'रावणसुरा' हा चित्रपट रिलिझ झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही फार मोठ्या प्रमाणात रिपोन्स मिळाला आहे. मराठीतला नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिर्यानी' (Ghar Banduk Biryani) हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. सध्या हिंदीतला किंवा साऊथमधला इतर कोणता मोठा चित्रपट यावेळी स्पर्धेत नव्हता त्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधल्याचे पाहायला मिळते आहे.

'भोला'शी टक्कर 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रावणसुरा' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 6 कोटी रूपयांची कमाई केली आहे. अजय देवगणच्या 'भोला'नंही पहिल्या दिवशी अशीच कमाई केली होती. आत्तापर्यंत 'भोला'नं 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. सोबतच या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 11 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या 'भोला' चित्रपटानंतर 'रावणसुरा' या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. 

काय आहे 'रावणसुरा' चित्रपट? 

रावणसुरा या चित्रपटात अॅक्शन, डान्स आणि ड्रामा असा तद्दन मसाला पाहायला मिळेल. हा एकप्रकारे अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुधीर वर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात अनु इमैनुएल, मेघा आकाश, फारिया अब्दुल्ला, दक्षा नागरकर आणि पूजीता पोन्नदा यांच्या भुमिका आहेत. हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे सगळीकडे या चित्रपटाचीच क्रेझ आहे. तुम्हीही जर का रवि तेजाच्या चित्रपटांचे फॅन असाल तर हा चित्रपट मिस करू नका.