Nora Fatehi चं 'हे' रुप तुम्ही कधीही नसेल पाहिलं... व्हिडीओ व्हायरल

नोरा फतेहीची दुसरी बाजू अखेर सर्वांसमोर; तिचं असं  रुप तुम्ही कधीही नसेल पाहिलं... व्हिडीओ व्हायरल  

Updated: Jun 3, 2022, 01:32 PM IST
Nora Fatehi चं 'हे' रुप तुम्ही कधीही नसेल पाहिलं... व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सोशल मीडियावर देखील नोरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नोरा स्वतःचे  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

आता देखील नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओतून हॉट आणि ग्लॅमरस नोराची दुसरी बाजू चाहत्यांच्या समोर आली आहे. नोराचं हे रुप तुम्हाला देखील फार आवडेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये नोरा एका चिमुकलीसोबत ठेका धरताना दिसत आहे. कायम आपल्या डान्सने चाहत्यांना घायाळ करणारी नोरा आता एका लहान मुलीसोबत गुडघ्यांवर बसून डान्स करताना दिसत आहे. चिमुकलीसोबत डान्स करताना तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सध्या नोरा अबू धाबी येथे आयफा (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी) पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. या सोहळ्या आधी, नोरा तिच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील नोराच्या प्रेमात पडाल.