घुमर गाणे नव्या स्वरूपात प्रदर्शित....

संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट पद्मावतचा अखेर प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 20, 2018, 05:41 PM IST
घुमर गाणे नव्या स्वरूपात प्रदर्शित.... title=

मुंबई : संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट पद्मावतचा अखेर प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर भन्साळीं एकामागोमाग एक नव्या गोष्टी प्रदर्शित करत आहेत. कालच नवा डायलॉग प्रोमो प्रदर्शित झाला. आता घुमर गाणे नव्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात आहे.

काय आहे वेगळेपण?

यातील वेगळेपण म्हणजे यात दीपिकाचे पोट व कंबर झाकण्यात आली आहे. पद्मावतीला करणी सेनेचा कडाडून विरोध होता. विशेष म्हणजे दीपिकाच्या घुमर गाण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. राजपूत स्त्रिया अशाप्रकारचे नृत्य करत नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं. गाण्यातील दीपिकाचं अंगप्रदर्शन वगळ्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मग ग्राफिक्सचा आधार घेत दीपिकाचं पोट आणि कंबर झाकण्यात आली आहे. 

 

२५ जानेवारीला प्रदर्शित

३०० कट्स आणि नावातील बदलानंतर पद्मावत प्रदर्शित होणार असला तरी काही ठिकाणाहुन चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होईल. 

padmaavat

पद्मावत: छुप गई दीपिका पादुकोण की कमर, यह रहा सबूत- देखें VIDEO

padmaavat