शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल

त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल. पण अरिजीतच्या तोंडून शिव्या ऐकण त्याच्या फॅन्सना अचंबित करणार असेल.

Updated: Jan 20, 2018, 04:33 PM IST
 शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल  title=

नवी दिल्ली :  आपल्या गायकीने सर्वांच मन जिंकणारा अरिजीत सिंहचे देशातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत.

गाण्याचे वेगळेपण आणि हसरा चेहरा अशी त्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पण एका कॉन्सर्टमध्ये अरिजीतने शिवी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल. पण अरिजीतच्या तोंडून शिव्या ऐकण त्याच्या फॅन्सना अचंबित करणार असेल.

व्हिडिओ व्हायरल

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यामध्ये अरिजीत स्टेजवर 'रॉकस्टार' सिनेमातील 'नादान परिंदे' हे गाणं गात आहे.

गाण गात असताना माईक खाली पडायला लागतो.त्यामूळे त्याची चिडचिड होते. आणि तो शिव्या द्यायला लागतो. 
 

 

त्यानंतर आयोजक लगेच स्टटेजवर येऊन माईक सरळ करतात. तस पाहायला गेल तर व्हिडिओ खूप जुना आहे.पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड  करतोय.