'या' अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलीचा जन्म

गेल्यावर्षी झालं होतं लग्न 

'या' अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलीचा जन्म  title=

मुंबई : बॉलिवूडमधून दररोज एक नवी गोड बातमी समोर येत आहे. शाहिद कपूर पाठोपाठ आणखी एक अभिनेता बाबा झाला आहे. या अभिनेत्याच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला आहे. गुरूवारी अभिनेता नील नितीन मुकेशच्या घरी चिमुकल्या पावलांनी या बाळाचं आगमन झालं आहे. नीलची पत्नी रूक्मिणीने एका सुदृढ मुलीला जन्म दिला आहे. 3.30 वाजता मुंबईतील ब्रेक कँडी रूग्णालयात बाळाचा जन्म झाला. 

या अगोदर एप्रिलमध्ये नीलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तो लवकरच बाबा होणार असल्याची घोषणा केली. त्याने लिहिलं होतं की, आता तो एका वेगळ्या इनिंगसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. आता आम्ही तीन होणार... गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये नीलने रूक्मिणीसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. 

शाहिद-मीरा और सानिया-शोएब के बाद अब नील नितिन मुकेश के घर आने वाली है खुशखबरी

नील नितिन मुकेश बॉलिवूडमधील महान गायक मुकेश यांचे नातू असून गायक नितीन मुकेश यांचा मुलगा आहे. नील यांनी अभिनयात पदार्पण करून 'जॉनी गद्दर', 'न्यूयॉर्क', 'गोलमाल अगेन' '7 खून माफ' सारखे सिनेमे केले आहेत. तसेच नीलचा आवाज देखील त्याला त्याच्या पूर्वजांकडून छान आवाज मिळाला आहे.