Neha Kakkar Marriage Anniversary : नेहा कक्करला (Neha Kakkar) तिच्या आवाजामुळे ओळखली जाते. नेहा कक्कर ने 2006 मध्ये इंडियन आयडल 2 या शो मधून एक स्पर्धक म्हणून सुरुवात केली. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिलीत. सुरुवातीचा तिचा प्रवास आपल्या सगळ्यांनाच माहित आहे खडतर होता पण तिनं न डगमगता तिच्या गाण्यांवर मेहनत घेतली आणि त्यामुळेच यशाची शिखरे गाठू शकली. तिच्या करिअरमध्ये तिनं सन्नी सन्नी, मनाली ट्रान्स, आओ राजा, धतिंग नाच, लंडन ठुमकदा, जादू की झप्पी या गाण्यांमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. नेहाला तिच्या भावनिक स्वभावाला जास्त ओळखले जाते. अनेकदा ती तिच्या भावनिक स्वभावामुळे देखील ट्रोल होते. ती गेल्या काही वर्षांपासून इंडियन आयडल या शो ची जज सुद्धा आहे. (Neha Kakkar Anniversary Neha and Rohanpreet got caught up in front of the camera in a romantic scene nz)
आज तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट हॅण्डल वर तिच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली असा व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओत नेहा आणि तिचा नवरा रोहन प्रीत सिंग हे सन्नी सन्नी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत आणि सोबतच एकमेकांना दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छाही देत आहेत. त्या व्हिडिओत ते दोघं ही खूप खूश दिसत आहेत. नेहाचा लग्न वाढदिवस हा दिवाळीतच असल्यामुळे तिला दोन्ही गोष्टींचा आंनद घेता येत आहे. तिनं तिच्या फॅमिलीसोबत ही दिवाळी साजरी केल्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
ती तिच्या नवीन गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी नेहा कक्करला तिच्या नवीन गाण्यासाठी सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले होते. तिनं गरबा क्वीन फाल्गुनी पाठकचे 'मैने पायल है छनकाई' या सुपरहिट गाण्याचं रिमिक्स वर्जन गायलं आणि तेव्हापासूनच ती ट्रोल होऊ लागली. अगदी फाल्गुनी पाठक यांनी देखील कडक शब्दात तिची निंदा केली.