'सून कधी घरी येणार?' रणबीर-आलियाच्या लग्नाबद्दल Neetu Kapoor यांचं मोठं वक्तव्य

अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार?   

Updated: Apr 2, 2022, 12:00 PM IST
'सून कधी घरी येणार?' रणबीर-आलियाच्या लग्नाबद्दल Neetu Kapoor यांचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत असताना रणबीरची आई नितू कपूर यांनी मुलाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

फोटोग्राफर्सने नितू कपूर यांनी 'सून कधी घरी येणार?' असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी दोन्ही हातवर केला. कदाचित त्यांना म्हणायचं असेल फक्त देवालाचं माहिती दोघांचं लग्न कधी होणार...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण एका साडी फॅशन ब्रँड आणि डिजायनरसोबत आलिया आणि रणबीरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.  महत्त्वाचं म्हणजे ज्या डिझायनरसोबत तिचा फोटो व्हायरल होत आहे, ती ब्रायडल साडी डिझाईनसाठी ओळखली जाते. 

एकंदर कपूर आणि भट्ट कुटुंबाची उत्सुकता पाहात आलिया आणि रणबीरचं लवकरचं लग्न होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.