'ये हे मोहब्बते' मालिकेतील अभिनेत्रीचा मृत्यू

चाहत्यांसाठी मोठा धक्का 

'ये हे मोहब्बते' मालिकेतील अभिनेत्रीचा मृत्यू  title=

मुंबई : लोकप्रिय मालिका 'ये हे मोहब्बते' च्या प्रेक्षकांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. या मालिकेतील एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. आज सकाळीच या अभिनेत्रीचं निधन झालं असून ही अभिनेत्री अनेक दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळाली. या अभिनेत्रीच्या निधनामुळे एकच शोककळा पसरली आहे. 

या मालिकेत नीलूचं पात्र साकारणारी अभिनेत्री नीरू अग्रवालचं आज सकाळी निधन झालं. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या या अभिनेत्रीला बाथरूममध्ये चक्कर आली आणि त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नीरू अग्रवालच्या मृत्यूची बातमी तिच्याच मुलीने 'ये हे मोहब्बते' या मालिकेतील कलाकारांना दिली. गेल्या कित्येक दिवसांपासून नीरू अग्रवाल तापामुळे त्रस्त होती. सकाळी जेव्हा ती बाथरूममध्ये जायला उठली तेव्हा तिला चक्कर आली. आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. याच मालिकेतील दिव्यांका त्रिपाठीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. 

दिव्यांका त्रिपाठीने इंस्टाग्रामवर नीरू अग्रवाल आणि आपला एक फोटो शेअर केला. आणि भावुक पोस्ट लिहिली आहे. दिव्यांकाच्या या पोस्टने अनेकजण गहिवरले. 

दिव्यांकाबरोबरच या मालिकेतील अभिनेता करण पटेलने देखील नीरू अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहिली. ये हे मोहब्बते या मालिकेत एका कामवाल्या बाईचं काम करणाऱ्या अभिनेत्रीचं असं अचानक सोडून जाणं सगळ्यांनाच चटका लावणार आहे.