Neena Gupta यांचे पती, विवेक मेहरा यांनी मसाबाशी... ; म्हणावं तरी काय?

त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. 

Updated: Aug 26, 2022, 02:52 PM IST
Neena Gupta यांचे पती, विवेक मेहरा यांनी मसाबाशी... ; म्हणावं तरी काय?  title=
neena gupta husband Vivek mehra shares his views on relation with masaba

मुंबई : लोकप्रिय आणि उतारवयातही बोल्ड भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी साकारलेली बरीच पात्र प्रेक्षकांच्या मनाच्या जवळचं स्थान मिळवून गेली आहेत. नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्यही त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच प्रचंड चर्चेत आलं. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूशी असणारं नातं, त्यानंतर एकट्यानंच या नात्यतून जन्मलेली मुलीचं संगोपन आणि पुढे उतारवयात लग्न... असा काहीसा नीना यांचा प्रवास. 

नीना गुप्ता यांनी 2008 चार्टर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा (Vivek Mehra) यांच्याशी लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वीच विवेक यांनी नीना यांच्यासोबत असणारं त्यांचं नातं जगासमोर आणलं. 1989 मध्ये नीना यांनी मसाबाला जन्म दिला. क्रिकेटर विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांच्यापासूनच्या नात्यातील ही मुलगी. 

विवियन विवाहित असल्यामुळं नीना आणि त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पुढे नीना यांनी लग्न न करताच मसाबाला मोठं केलं. विवेक यांनी त्यांना उतारवयात साथ दिली. एका मुलाखतीदरम्यान, विवेक यांनी मसाबाशी असणाऱ्या त्यांच्या नात्याविषयी सांगताना सर्वकाही सुरळीत असल्याचं स्पष्ट केलं होतं. (Neena Gupta Masaba)

'आजकाल ती माझ्याशी खुपकाही बोलते, आम्ही बऱ्याच विषयांवर चर्चाही करतो. मी तिची मदत करतो, तिला सल्ले देतो ज्यामुळं हेसुद्धा कळतं की माझ्यावर तिचा विश्वास आहे', असं ते म्हणाले होते. 

विवेक आणि नीना यांचं लग्न झालं, तेव्हा मसाबा फारशी मोठी नव्हती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असणारी चिंता विवेक यांनाही स्पष्ट दिसली होती. पण, काळाच्या ओघात तिनं विवेक यांचा आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून स्वीकार केला. 

viral video: वडिलांसोबत मी पहिल्यांदा...; तेच माझे Boyfriend, नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

जिथे नात्यांची समीकरणं बदलतात, तिथे या सेलिब्रिटी कुटुंबात मात्र मोठ्या मनानं काही नाती स्वीकारली गेली. अनेकांनाच ही बाब पचवण्यास वेळ गेला, पण नात्याचं कौतुक वाटणारेही कमी नव्हते.