मुंबई : ड्रग्स कनेक्शन प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्याकडून सतत चौकशी सुरु आहे. यामध्ये आता दिग्दर्शक करन जोहरच्या अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीने यासंदर्भात करन जोहरला समन्स पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीला करन जोहरकडून बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याविषयी महत्वाची माहिती हवी आहे. करन जौहरच्या घरी सेलिब्रिटींच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करनचं नाव चर्चेत आलं होतं.
शिरोमणी अकाली दलचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी सप्टेंबरमध्ये करन जोहर, दीपिका पादुकोण, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, विक्की कौशल, वरुण धवन आणि इतर कलाकारांविरूद्ध कारवाईची मागणी केली होती. मनजिंदरसिंग सिरसा यांनी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेऊन करण जोहर आणि इतरांवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन केल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी केली.
16 डिसेंबरला एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (अर्जुन रामपाल) ला समन्स पाठवले. अर्जुन रामपालला एनसीबीच्या मुंबई युनिटने समन्स बजावले आहे.