गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजही तो दिवस आठवतो...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. गेली आठ दशकं त्यांना आपल्या मधूर आवाजानं अनेकांच्या मनात घर केलंय. 

Updated: Dec 17, 2020, 09:36 PM IST
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजही तो दिवस आठवतो... title=

मुंबई  : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. गेली आठ दशकं त्यांना आपल्या मधूर आवाजानं अनेकांच्या मनात घर केलंय. लता मंगेशकर सोशल मीडियावरुन प्रेक्षकांच्या नेहमीच संपर्कात असतात. नुकतंच त्यांनी रेडिओवर गायलेल्या आपल्या पहिल्या गाण्याची आठवण चाहत्यांसोबत शेअर केलीये.

काय म्हणाल्या लतादीदी -

''१६ डिसेंबर १९४१ साली मी माझ्या कारकिर्दीतील रेडिओवरील पहिलं गाणं गायलं होतं.' अशा आशयाचं ट्विट करत लता मंगेशकर यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यांचं हे ट्विट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. आज वयाच्या ९१ व्या वर्षीही त्या सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांच्या या ट्विटवर अनेका चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात आहेत. जगभरातील हजारो चाहत्यांनी या गाण्यासाठी त्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

२८ सप्टेंबर १९२९साली इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला.