मुंबई : काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा बॉलीवूडमध्ये एन्ट्री करु शकते, अशी चर्चा सुरु झाली होती. पण या अफवा चुकीच्या ठरल्या. नव्याने तिचे वडील निखिल नंदा यांच्या व्यवसायात रस दाखवला आहे आणि ती एक बिझनेस वुमेन बनली.
आता नव्याने तिच्या करिअरबाबत काही खुलासे केले आहेत. नव्याने सांगितले की, "बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं आहे असं काही ठरलं नव्हतं. मला डान्स वगैरे करायला आवडतो. पण मी अभिनयाला करिअर बनवावं इतकी सीरिअस नव्हते.
मला बिझनेसमध्ये नेहमीच रस आहे. माझी आजी आणि मामी दोघीही वर्किंग वुमन आहेत. कौटुंबिक व्यवसायातही त्या काही प्रमाणात सक्रिय आहेत. मी नंदा कुटुंबाची चौथी पिढी आहे आणि मला हा वारसा आनंदाने पुढे न्यायचा आहे."
पुढे नव्या म्हणते,"मला माझ्या वडिलांना प्रत्येक गोष्टीत साथ द्यायची आहे. एक महिला असल्याने मला व्यवसाय पुढे नेण्यासाठी खूप अभिमान वाटेल. पण, अभिनय ही अशी गोष्ट आहे जी मला नंतर कधीही करायला आवडेल.
नव्याचे बोलणे ऐकून आई श्वेता म्हणाली, "तु खूप कमी वेळा असं ठरवलं होतं की अभिनय हेही तुझ्यासाठी करिअर होऊ शकते. मला दोन्ही मुलांची काळजी वाटते. आम्हाला खूप सवलती मिळाल्या आहेत आणि सर्वांच्या नजरा नेहमीच आमच्याकडे असतात."