पाहिलंत का "नाळ" चं पहिलं गाणं "जाऊ दे न व"...?

अफलातून गाणं 

मुंबई : बहुचर्चित 'नाळ' या सिनेमाचं पहिलं रिलीज झालं आहे. 'जाऊ दे न व...' असं या गाण्याचं नाव आहे. या सिनेमातील लहान मुलगा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. लहान मुलाचं विश्व आणि त्याची निरागसता या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नाळच्या या पहिल्या गाण्याचं लिरिक्स देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. 

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नागराज मंजुळे या सिनेमाची निर्मिती करत आहे. आणि या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज नव्हे तर सुधाकर रेड्डी करणार आहे.