नाळ सिनेमा पाहिल्यानंतर त्या महिलेला रडू आलं....!

'नाळ' हा सिनेमा पाहिल्यानंतर काहींना तर अश्रू आवरले नाहीत. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेताना एका महिलेला कॅमेऱ्यासमोर रडू आलं.

Updated: Nov 17, 2018, 10:05 PM IST
नाळ सिनेमा पाहिल्यानंतर त्या महिलेला रडू आलं....! title=

मुंबई : 'नाळ' हा सिनेमा पाहिल्यानंतर काहींना तर अश्रू आवरले नाहीत. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेताना एका महिलेला कॅमेऱ्यासमोर रडू आलं. यानंतर नाळ सिनेमात असं कोणतं भावनिक दृश्य आहे, किंवा कथानक गुंफलं गेलंय, की प्रेक्षकांना रडू कोसळतं (पाहूयात नाळ पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या या काही निवडक प्रतिक्रिया. पाहा व्हिडीओ सर्वात खाली) झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांचा नाळ सिनेमा अखेर प्रदर्शित झालाय. 

फँड्री आणि सैराटच्या अफाट यशानंतर नागराजच्या या नव्या सिनेमाकडून सिनेमा रसिकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळंच आज शुक्रवारी अगदी झुंडीनं प्रेक्षक नाळ पाहायला चित्रपटगृहांकडे वळले.  या नव्या सिनेमाशी प्रेक्षकांची नाळ पुन्हा एकदा जुळली गेली. 

नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात असल्या तरी प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळतेय ती बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला... सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातील जाऊ दे न वं... या गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळालीय.