Prerna Arora : भारतीय चित्रपट उद्योगासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात फार कमी महिलांना स्वत:साठी एक वेगळं आणि तितकच खास स्थान मिळवता आल आहे. आजही अनेकांना महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटाची पाठराखण करावी लागली असून गेल्या काही वर्षांत अनेक महिलांनी त्यांना हव्या त्या कथा सांगण्यास आणि सक्षम होण्यासाठी चित्रपट निर्मितीचा व्यवसाय स्वीकारला आहे. क्रिती सॅनन, आलिया भट्ट आणि सारख्या अभिनेत्रींनी त्यांना ज्या प्रकारचा कंटेंट बनवायला आवडेल अशा प्रकारची निर्मिती करण्यास सुरुवात केली, त्यामुळे इंडस्ट्रीत मोठा बदल होत आहे आणि यांच्या प्रवासात प्रेरणा अरोरा, एकता कपूर, रिया कपूर, गुनीत मोंगा आणि इतरांसारख्या चित्रपट निर्मात्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रेरणानं कायम वैविध्यपूर्ण विषयावर चित्रपट केले असून ती कायम चर्चेत असलेली निर्माती आहे. इंडस्ट्रीत असलेली पुरुषप्रधान संस्कृती आणि महिलांना मिळणारी असमान वागणुक यावर ती स्पष्ट बोलली आहे.
रुषप्रधान संस्कृती आणि महिलांना मिळणारी असमान वागणुकीवर प्रेरणा या बोलताना म्हणते की, "आम्ही खूप पुढे आलो आहोत पण आजही अभिनेत्यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या तुलनेत महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटांना तितकं महत्त्वपूर्ण स्थान दिलं जात नाही. इतकंच नाही तर असमान वागणूक मिळते. एक काळ असा होता जेव्हा चित्रपटाच्या सेटवर एकही महिला नसायची आज कमीत कमी 30-50% स्त्रिया त्यांच्या कथा सांगतात. इंडस्ट्रीत महिला संस्कृती केव्हा येणार? आणि त्यांना कधी समान वागणूक मिळणार यासाठी आम्ही वाट बघत आहोत."
लिंग समानता आणि त्याबाबतच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलताना प्रेरणा म्हणाली, "पाहा 'क्रू'ने कसा पल्ला गाठला! इंडस्ट्रीत होणारी ही असमान वागणुक कायम चर्चेत असते पण आजही यावर काही उपाय निघाला नसून आम्हाला महिला निर्मात्या म्हणून खूप लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आम्ही अर्ध्या वाटेवर पोहोचलो आहोत."
प्रेरणा अरोरा निर्माती म्हणून तिचा प्रवास सुरू केल्यापासूनच आऊ लट-ऑफ-द-बॉक्स प्रोजेक्ट्स घेऊन आली आहे. तिनं कायम वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट केले आहे आणि समाजात त्याचा प्रभाव देखील तितकाच पडला आहे.
हेही वाचा : काजोलसोबत हनीमूनवर असताना अजय देवगणला का आला होता ताप?
प्रेरणा यांच्या फिल्मोग्राफीमध्ये 'पॅडमॅन', 'परी', 'टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि 'रुस्तम' सारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे आणि लवकरच ती अजून दोन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ती तिचे दोन चित्रपट 'हिरो हिरोईन' आणि 'डंक: वन्स बिटन ट्वीस शाई' हे चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत असून जे लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहेत आणि प्रेरणा यासाठी उत्सुक आहे.