नातं असावं तर असं ! सासूच्या पायात जोडवी घालताना मितालीच्या डोळ्यात अश्रू, सासूसुनेचा ऋणानुबंधाचा VIDEO VIRAL

Video : मितालीच्या लग्नात मी तिच्या पायात आणि आज...सासूसुनेचा ऋणानुबंधाचा तो क्षण सोशल मीडियावर व्हायरल  

नेहा चौधरी | Updated: Aug 26, 2023, 11:13 AM IST
नातं असावं तर असं ! सासूच्या पायात जोडवी घालताना मितालीच्या डोळ्यात अश्रू, सासूसुनेचा ऋणानुबंधाचा VIDEO VIRAL title=
Mitali Mayekar In Mother In Law Marriage sweet moment Video viral trending now

Mitali Mayekar In Mother In Law Marriage Video : सासू सूनचं नातं हे बदनाम असतं, पण गेल्या काही काळात हे नातं बदलत आहे. सासू सून आज एकमेकींच्या मैत्रिणी झालेल्यात नोकरी करणाऱ्या सुनेच्या मागे सासू खंबीरपणे उभी आहे. अशी अनेक नाती आपण पाहत आहात. अशातच मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या आईचं दुसरं लग्न लावलं त्यानंतर याचावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. या सोहळ्यात सून अभिनेत्री मिताली हिची भूमिकेने तर सर्वांना जिंकलं आहे. सासू सुनेच्या नात्यातील भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सासू सुनचं हे ऋणानुबंध पाहून नातं असावं तर असं हेच म्हणावसं वाटतं आहे. (Mitali Mayekar In Mother In Law Marriage sweet moment Video viral trending now)

 सासूसुनेचा ऋणानुबंधाचा VIDEO VIRAL

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली हे जोडपं सोशल मीडियावर सक्रीय असून अतिशय प्रसिद्ध आहेत. हे दोघं कायम चर्चेत असतात. सिद्धार्थने आईच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा सोशल मीडियावर केली. त्या सुंदर पोस्टने तर लोकांची मनं जिंकली. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उतार वयात एका जोडीदाराची गरज असते हे समजून त्यांनी आईचं लग्न लावलं. हळूहळू का होई ना ही संकल्पना आता रुजू होताना दिसतं आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यात जोडीदाराची गरज असते. फक्त हे समजून घेणं जरी कठीण असलं तरी प्रयत्न केल्या या नात्याला नवीन रुप मिळू शकतं. 

नातं असावं तर असं!

या लग्नातील एक क्षण हा अनेकांना भावूक करतोय. सासू सूनेचं नातं कसं असावं हे सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. जेव्हा सिद्धार्थ आणि मितालीचं लग्न झालं होतं. तेव्हा सिद्धार्थच्या आईने मितालीच्या पायात जोडवी घातली होती. आता मितालीने सासूच्या लग्नात सासूच्या पायात जोडवी घातली. जोडवी घालताना मिताली भावूक झाली आणि त्याचा डोळ्यातून अश्रू आलेत. चित्रपटात आणि मालिकेत दिसणारे हे क्षण जेव्हा प्रत्यक्षात उतरात ते काळजात घर करु घेतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिताली जेव्हा सासूच्या पायात जोडवी घालते तेव्हा सासू सीमा चांदेकरही सुनेचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. तिच्या लग्नात मी जोडवी घातली होती आज माझ्या लग्नात ती जोडवी घालत आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असल्याचा मितालीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मितालीच्या या कृत्याने तिने चाहत्यांसोबतच सगळ्यांचं मनं जिंकल आहे. या व्हिडीओवर कलाविश्वातील अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. ''खूप छान काम केलाय आदर्श आहेत दोघे ज्यांनी आईला नवीन आयुष्य दिलं तिलाही हक्क आहे स्वत:च आयुष्य जगण्याचा'' अशी एकाने कमेंट केली आहे.