Miss World 2024 Amitabh Bachchan : मिस वर्ल्ड ही स्पर्धा जवळपास 28 वर्षांनंतर भारतात परतला आहे. आज म्हणजेच 9 मार्च रोजी ही स्पर्धा पारपडणार आहे. मिस वर्ल्ड 2023 फिनाले आज संध्याकाळी मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व फेमिना मिस इंडिया-2022 चं विजेती सिनी शेट्टी करणार आहे. 27 वर्षांपूर्वी भारतात हा कार्यक्रम पार पडला होता. मात्र, आजोयकांसोबत अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी हा खूप चांगला अनुभव नव्हता.
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची यादी आजही वाढताना दिसते. 70 च्या दशकात तर त्यांना अनेक नावांनी ओळखायचे. पण आज अमिताभ यांना इतकी लोकप्रियता मिळालेली असली तरी त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. कठीण प्रसंगांचा सामना करत असताना असा एक काळ आला जेव्हा त्यांनी खूप वाईट काळ पाहिला होता आणि त्याच कारणामुळे त्यांच्या हातून मिस वर्ल्ड या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी सुटली होती.
वीर सांघवीला दिले्ल्या एका मुलाखतीत अमिताभ यांनी या गोष्टीचा खुलासा केला की, त्यांना या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपनीकडून भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव मिळाला होता. त्यांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून ते घाबरत होते. कारण आमच्याकडे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी फक्त चार महिन्याचा काळ होता. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याआधी त्यांनी त्यांची कंपनी एबीसीएलमध्ये असलेल्या त्यांच्या टीमशी चर्चा केली. बंगळुरुमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरले, त्यावेळी कर्नाटकात दोन प्रकारचे आंदोलन सुरु झाली. एकीकडे फेमिनिस्ट महिलांचे म्हणणे होते की अशा प्रकारच्या ब्यूटीच्या स्पर्धेमुळे मोठ्या संख्येत असलेल्या महिलांना खालचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. महिला जागरण संस्थेच्या अध्यक्ष आर. शशिकलानं धमकी दिली की जर मिस वर्ल्ड स्पर्धेला थांबवण्यास त्यांना यश मिळाले नाही तर ते आत्महत्या करतील. तर दुसरीकडे काही लोकांचे म्हणणे होते की अशा प्रकारचे कार्यक्रम समाजाच्या संस्कृती आणि सभ्यतेला खराब करत आहेत. हा विरोध इतका वाढला होता की अखेर मिस वर्ल्ड या कार्यक्रमात होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांपैकी एक स्विम सूटला बंगळुरु ऐवजी सेशेल्समध्ये करण्यात आला.
अमिताभ याविषयी मिळाले की त्यांनी आधीच या सगळ्या गोष्टीविषयी विचार केला होता आणि जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता की भारत एक जागतिक स्तरावर असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सक्षम आहोत. जो कार्यक्रम जग भरात पाहिला जाणार. जर आम्ही मिस वर्ल्डला नाही म्हणालो असतो, तर असं झालं असतं की भारत असा कार्यक्रम करण्यासाठी सक्षम नाही.
डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चननं 1996 मध्ये ABCL नावानं कंपनीची सुरुवात केली. बिग बी यांना 4 वर्षात या कंपनीचा रेव्हेन्यू 1000 कोटींपर्यंत पोहोचवायचा होता. त्यांना वाटलं होतं की मिस वर्ल्ड कार्यक्रमाच्या आयोजनानं त्यांना खूप फायदा होईल. मात्र, असं झालं नाही. या कार्यक्रमामुळे त्यांचे 70 कोटी खर्च झाले. बॅंकेनं ते पैसे वसूल करण्यासाठी त्यांना नोटीस पाठवली, त्यानंतर अमिताभ यांना बँकेचं कर्ज बुडवण्यासाठी त्यांचा जुहू येथील बंगला गहाण ठेवावा लागला. कंपनीविरोधातील अनेक प्रकरणे न्यायालयात पोहोचली आणि बिग बींना खटल्यांचा सामना करावा लागला.
हेही वाचा : 'डुक्करासारखं खातो आणि श्वानासारखा...', सलमान खानसंदर्भात अभिनेत्याचं धक्कादायक विधान
यानंतर अमिताभ बच्चन यांच्या ABCL या कंपनीच्या बॅनरखाली अनेक चित्रपट बनले, पण त्यातील अनेक चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे त्यांची कंपनी आणखी कर्जात बुडाली. 1999 मध्ये एबीसीएलवरील एकूण कर्ज 90 कोटी रुपयांवर पोहोचले होते. त्याला या कर्जातून बाहेर काढण्यात अमरसिंह आणि धीरूभाई अंबानी यांचा मोठा वाटा होता.