एका अपघातानंतर बदललं 'या' मॉडेलचं आयुष्य, आज घरी बसून महिन्याला कमावते इतके कोटी

या मॉडेलचा अपघात झाल्यानंतर ती कित्येक महिने बेड रेस्टवर होती. 

Updated: Oct 23, 2022, 06:00 PM IST
एका अपघातानंतर बदललं 'या' मॉडेलचं आयुष्य, आज घरी बसून महिन्याला कमावते इतके कोटी title=

मुंबई : हिंमत हारली नाही तर जगातील कोणत्याही संकटातून परत येणं अवघड नाही. आज आपण अशाच एका मॉडेल विषयी जाणून घेणार आहोत. या मॉडेलला कार अपघातानंतरही चालायला सुद्धा होत नव्हते. आज ती तिच्या धैर्यानं ती कोटींच्या रुपयाची कमाई करते. या सुपरमॉडेल आणि ब्युटी आयकॉनचं नाव मिया मिरांडा आहे. मिया मूळची कॅनडातील व्हँकुव्हरची आहे. इंटरनेटच्या जगात म्हणजेच सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. अखेर मियां मिरांडा सध्या चर्चेत का आहे ते जाणून घेऊया... 

'डेली स्टार'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिया मिरांडा 2020 मध्ये कार अपघातानंतर अनेक महिने बेड रेस्टवर होती. तिला दैनंदिन कामासाठी इतरांची मदतही घ्यावी लागत होती. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्याचा निर्णय घेतला आणि नंतर तिच्या यशाचे नवे उदाहरण तिनं सगळ्यांसमोर ठेवले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अॅडल्ट वेबसाइट आणि मोबाइल अॅप ओन्लीफॅन्सला गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि पाश्चात्य जगातील जवळपास प्रत्येक देशात मोठी मागणी आहे. या साईटवर शेकडो महिला त्यांचे फोटो शेअर करतात. या अॅपमधून महिला कोटींची कमाई करत आहेत. या अॅपच्या माध्यमातून कार अपघातानंतर बेडवर असलेल्या मिरांडाच्या आयुष्याने यू-टर्न घेतला. या साइटवर ती दर आठवड्याला लाखोंची कमाई करत आहे. ती काही मोठ्या ब्रँड्सनाही एंडोर्स करत आहे. या कामातून तिला चांगले पैसे मिळतात. 

कोरोनाच्या काळात या कंपनीच्या कमाईत विक्रमी वाढ झाली होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्याच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढली होती.अलीकडेच मीडियाशी बोलताना ती म्हणाली, 'कार अपघातानंतर मी खूप वेदना, अस्वस्थता आणि तणावात होते. मला चालणेही अवघड झाले होते आणि मला प्रवासही करता येत नव्हता. त्या काळात मला माझ्या मित्रांना भेटण्याची इच्छा होती. अशा परिस्थितीत एका सल्ल्यानुसार मी OnlyFans जॉइन करण्याचा निर्णय घेतला.

आज मिया मिरांडा प्रचंड कमाई करत आहे. ती आता मेंबरशिप-बेस्ड साइटवर दर आठवड्याला सुमारे £4500 ते £5000 कमावते. याशिवाय, डान्स आणि एंडॉर्समेन्टसारख्या गोष्टींमधून ती चांगलीच कमाई करते. ती आठवड्याला सुमारे 20-25 लाख रुपये कमावते. त्यानुसार ती एका महिन्यात सुमारे 1 कोटी रुपये कमावते.