मिया खलिफाने फोटो शेअर करत हेटर्सला दिला इशारा, फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी मिया खलिफाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर तिने आपण सुखरुप असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Updated: Feb 7, 2022, 09:46 PM IST
मिया खलिफाने फोटो शेअर करत हेटर्सला दिला इशारा, फोटो व्हायरल title=

वॉशिंग्टन : माजी अडल्ट स्टार मिया खलिफाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिचा तिरस्कार करणाऱ्यांना इशारा दिला आहे. यानंतर मिया खलिफाचा फोटो व्हायरल झाला. मात्र, नंतर दुसरी पोस्ट करून मिया खलिफाने द्वेष करणाऱ्यांना योग्य म्हटले.

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिया खलिफा बेडरूममध्ये एका वॉर्डरोबसमोर उभी असलेली दिसत आहे. या फोटोला कॅप्शन म्हणून तिने लिहिले की, 'हेटर्स म्हणतील हे सगळे अँगल आहेत.'

मिया खलिफाचा फोटो व्हायरल

मिया खलिफाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. थोड्या वेळाने मिया खलिफाने आणखी एक पोस्ट केली, ज्यामध्ये तिने लिहिले, 'हो ती बरोबर आहे'.

adult star mia khalifa

इंस्टाग्रामवर मिया खलिफाच्या लाखो फॉलोअर्स

विशेष म्हणजे सोशल मीडियावर माजी अॅडल्ट स्टार मिया खलिफाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मिया खलिफाचे इंस्टाग्रामवर 27 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती स्वतः 871 लोकांना फॉलो करते.

काही दिवसांपूर्वी मिया खलिफाच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. ज्यानंतर मिया खलिफाने स्वतः स्वस्थ असल्याचं सांगितलं. तिचे काहीही वाईट झालेले नाही. मिया खलिफाच्या मृत्यूची बातमी ऐकून अनेक युजर्सनी तिच्या निधनावर शोक व्यक्त केला. मात्र, नंतर मिया खलिफाच्या मृत्यूची बातमी खोटी निघाली.