मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडनं केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सलमान खानची Ex गर्लफ्रेंड सोमी अलीने अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षीच आपल्या अभिनयानं रसिकांची मन जिंकली. बॉक्सऑफिसवर तिने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. तिने आता केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
काही वेदना विसरणं खूप जास्त त्रासदायक असतं. अशीच एक घटना सोमी अलीच्या बाबतीत घडली. नुकत्याच पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने सांगितले, 'जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी पहिल्यांदा पाकिस्तानात होते. वयाच्या 5 आणि 9 व्या वर्षी माझ्या कुककडून माझं लैंगिक शोषण झालं,' असा खुलासा सोमी अलीनं केला आहे.
वयाच्या 14 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाल्याचा खळबळजनक दावा तिने केला आहे. जेव्हा ही गोष्ट तिने तिच्या आई-वडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कुकवर कारवाई केली. मात्र ही गोष्ट कुणाशी बोलू नकोस असंही त्यावेळी त्यांनी बजावल्याचं सोमी अलीनं सांगितलं. मी भारतात आले तेव्हा माझं वय 16 वर्ष होतं. तेव्हा१६ ते २४ वर्षांच्या दरम्यान माझ्याबरोबर घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या.
आई- वडिलानी दिला नकार
सोमी अली पुढे म्हणाली की, 'तू कुणालाही या गोष्टीबद्दल वाच्चता करू नकोस असं मला आई-वडिलांकडून बजावण्यात आलं. मी विचार केला की मी काही चुकीचं केलं का? मला माझ्या आई-वडिलांनी असं का सांगितलं असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले. माझे आई-वडील माझं संरक्षण करत होते जे त्यावेळी मी समजू शकले नाही.
'No More Tears' NGO चालवते सोमी
सोमी अली 'नो मोअर टीयर्स' (No More Tears) नावाची एक एनजीओ चालवते. या स्वयंसेवी संस्थेअंतर्गत भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतील महिलांसाठी काम केलं जातं. अशा महिला ज्यांच्यावर लैंगिक, मानसिक आणि शारीरिक अन्याय झाला किंवा त्याचे बळी झालेल्या महिलांना ही संस्था मदत करून त्यांचं पुनर्वसन करते.